म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे उपकेंद्र वारळ हे धूळखात पडले आहे . तेथील आरोग्य कर्मचा-यांची स्थिती दयनीय आहे . त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सवचा बोजवारा उडाला आहे , शासनाच्या निकषाप्रमाणे तेथील कर्मचा-यांची संख्या ३ मंजूर असून यापैकी ३ ही पदे रिक्त असल्याने तेथील नागरिकांची आरोग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याने अनेक नागरिकांना वांचित राहावे लागत आहे . या उपकेंद्रातंर्गत तुरुंबाड़ी , रोहिणी वारळ , काळसुरी , आडीठाकुर अशी वाड्यांची संख्या ४,१४५ असून त्याठिकाणी आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी सेवा देण्यासाठी हजर नाही. या आरोग्यकेंद्राअंतर्गत शासनाची नेमून दिलेली सेवा एक आरोग्यविषयक सर्व सेवा लसीकरण , मातातपासणी , किरकोळ , प्रथोमोपचार अन्य आरोग्य सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट शासनाचे आहेत . परंतु या उद्दिष्टांची चक्क पायमल्ली केली आहे . जिल्हा परिषेदतंर्गत असणारा उपकेंद्र तो कोणत्या स्थितीत आहे त्याची स्थिती कशी आहे . याची माहिती घेण्याची जबाबदारी देखील राजकत्यम ध्ये नाही . जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी त्यांच्या अध्यक्षा त्याच मार्गाने अनेक वेळा जातात परंतु रस्त्यालगत असलेले उपकेंद्र बंद आहे ? ते का बंद आहे ? याची चाचपणी देखील केली जात नाही , ही खेदजनक बाब असल्याचे मत तेथील ग्रामस्थ करत आहेत . वारळ या ठिकाणी असणारी लोकवस्ती ही गरीब, गरजू सर्वसामान्य अशी आहे . परंतु त्यांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने तेथील नागरिक आज वंचित आहेत . त्यांच्यामुळे त्यांना सेवा मिळण गरजेचे आहे . त्यासाठी प्रशासन कोणती भूमिका घेते , हे पाहणे गरजेचे आहे .

Post a Comment