शेखाडी मराठी शाळेला ‘ आदर्श शाळा ' पुरस्कार


प्रतिनिधी बोर्लीपंचतन
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात येते . यंदा जिल्ह्यातील १५ हुन अधिक शाळा या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या . २०१८ - १९ या वर्षीच्या आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळांमध्ये श्रीवर्धनमधील शेखाडी मराठी शाळेचा समावेश असून , जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते या शाळेचा गौरव करण्यात आला . यामध्ये डिजिटल एबीएल शेखाडी मराठी मुलांच्या शाळेला रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते आदर्श शाळा २०१८ - १९ पुरस्कार प्रदान करण्यात आला . याप्रसंगी राजिप उपाध्यक्ष आस्वाद पाटील , शिक्षण क्रीडा आरोग्य सभापती नरेश पाटील , सभापती नारायण डामसे , प्रमोद पाटील , उषा मुंढे , शेखाडी शाळेचे मुख्याध्यापक निनाद विरकूड , सहकारी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सर्व शाळेच्या शिक्षकांचे कौतुक करताना , राजिप अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सांगितले की , जिल्हा परिषदेच्या शाळा शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर असून शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे सांगितले . तर शेखाडी मराठी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक निनाद विरकूड यांनी आजी - माजी पंचायत समिती सभापती , श्रीवर्धन सर्व तालुक्यातील पदाधिकारी , गटशिक्षणाधिकारी राऊत व कुळकर्णी , केंद्रप्रमुख शितल तोडणकर व म्हात्रे , शिक्षक , ग्रामस्थ यांच्या सहकार्याचे हे यश असल्याचे सांगितले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा