कोकण विकासासाठी स्वतंत्र पॅकेज हवे - अनंत गीते



टीम म्हसळा लाईव्ह
कोकणाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर कोकणाला स्वतंत्र पॅकेज मिळाले पाहिजे  अशी भूमिका केंद्रीय मंत्री ना . अनंत गीते यांनी गुरुवारी महाड येथे बोलताना मांडली . महाड परिवहन स्थानकाच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन गुरुवारी ना . गीते यांच्या हस्ते करण्यात आले . त्याप्रसंगी ते बोलत होते . यावेळेस आ . निरंजन डावखरे , आ . प्रवीण दरेकर , आ . भरत गोगावले , जि . प . सदस्य मनोज काळीजकर , संजय कचरे , जि . प . चे माजी उपाध्यक्ष बाळ राऊळ , शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश महाडीक , शहर प्रमुख नितीन पावले , भाजपाचे तालुका प्रमुख जयवंत दळवी , विभाग नियंत्रक अनघा बारटक्के , आगार व्यवस्थापक अशोक कुलकर्णी , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते . राज्य परिवहन महामंडळ हे तोट्यात असले तरी  प्रवासी सेवा देण्यात हे महामंडळ देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे महामंडळ असल्याचे गौरवोदगार ना . गीते यांनी यावेळेस काढले . महाड एमआयडीसीपर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . या परिवहन स्थानकाच्या भूमीपूजनाचा मान आपल्याला मिळाला . उद्घाटन समारंभालादेखील मंत्री म्हणून आपण उपस्थित राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . आ . प्रवीण दरेकर यांनी पक्षापलिकडे जावून महाड तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले . राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या बसेस , आणि विठ्ठलाला चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले , महाबळेश्वर - दापोली महामार्ग व्हावा असेही ते म्हणाले . शिवसेना - भाजपाची वारी विठ्ठलाला ( ना , गीते यांना ) दिल्लीच्या पंढरपरात घेवन जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . आ . निरंजन डावखरे यांनी आपल्या भाषणात महाड परिवहन आगार हे मुंबई - गोवचा महामार्गावरील महत्वाचे परिवहन स्थानक असून , या आगारातून सुटणाऱ्या फेऱ्यांची संख्या वाढणे आवश्यक असल्याचे सांगितले . आ . भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात , महाड परिवहन आगाराची झालेली दूरवस्था आपल्या मनात कमीपणाची भावना निर्माण करणारी होती . आता या परिवहन स्थानकाचे भूमीपूजन झाल्याने लवकरच एक सुसज् परिवहन स्थानक मूर्त स्वरुपात उभे राहील असे सांगितले . या स्थानकाला मंजुरी मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली . प्रस्ताविक विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले . सुत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा