संजय खांबेटे : म्हसळा
महिलांनी सर्व क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं आहे, गाव विकास प्रक्रियेतही महिलांचा सहभाग महत्वाचा ठरत आसल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी रायगड जिल्ह्या परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाने आयोजित केलेल्या महिला दीना निमीत्त पोषण आहार सप्ताहाचे कार्यक्रमात मत व्यक्त करताना केले,
महिलांसाठी विविध प्रभोधनात्मक कार्यक्रम, विविध विषयाच्या कार्यशाळा घेतल्याने, शासनाचे महिलां विषयी सकारात्मक धोरण यामुळे सक्षमीकरण गतीमान होऊ शकले. यावेळी शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी लिंग समानतेच्या बाबत बोलताना सांगितले की स्त्रियांनी समाजाचे सहनुभूतीवर न जगता सर्व क्षेत्रात स्वतःला सिद्ध करावे , केंद्र व राज्य शासनाचे धोरणात स्त्रियाना विशेष प्राधान्य आहे . अनेक तरुणी I.A.S, I.P.S. होऊन देशाचे प्रशासन व्यवस्थेत त्यानी आपला ठसा उमटविला आसल्याचे सांगितले. डॉक्टर प्रणाली पाटील यांनी मासिक पाळीत घ्यायची काळजी व राखावयाची स्वछता या विषयी तर समुपदेशक सौ मनीषा गायकवाड यांनी कौटुंबिक हिवंसाचार कायदा व त्यातील कलमे यांचा वापर या विषयी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची रूपरेषा व मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप हळदे ,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती उमा मुंडे यांचे होते .यावेळी पोषणआहार पखवाडा ( पंधरवडा ) या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करणेत आले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री नितिन मंडलिक व उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती शीतल पुंड यांचीही संमयोचोत भाषणे झाली कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन आनंद धिवर यांनी केले आभार प्रदर्शन मेघा म्हात्रे यांनी केले कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment