म्हसळा घोणसे येथे जे.एम.म्हात्रे कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराने युवा कामगाराचा अपघाती मृत्यु



(म्हसळा - प्रातिनिधी )

दिघीपुणे हमरस्ता हा नव्याने अद्ययावत व दुपदरी करण्याचे काम सुरू आसुन हा रस्ता तयार करण्यासाठी जे.एम.म्हात्रे कंपनीची दिवसरात्र  सुरू आहे.या कंपनीचा मुख्य फ्लँट म्हसळा घोणसे हद्दीत हमरस्त्यावर आहे.या फ्लँट वर
कामगारांची पाहिजे तशी काळजी घेतली जात नसल्याने व परस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने घोणसे फ्लँट
 अपघाती ठरून कामगारांचा कर्दनकाळ ठरत आहे वर्षभरात येथे दोन कामगार अपघातात मरण पावले आहेत.दोन महिन्यांपूर्वी म्हसळा गवळवाडी येथील सुधाकर चोगले या 48 वर्षाच्या तरुणाचा घोणसे फ्लॅंटवर काम करताना अपघाती मृत्यू झाला आहे आज याच ठिकाणी  युवा कामगार नौशादअली मोहमदअली शेख वय वर्षे 22,मुळ निवासी ठुमरियागंज,तालुका इटवा,जिल्हा सिद्धार्थनगर हा कामगार  काम करीत असताना त्याला डंपर गाडीची मागवून ठोकर लागल्याने त्याचा अपघाती मृत्यु झाल्याची घटना दिनांक 8 मार्च 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली आहे. अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात येथील कामगार नशीबुला अ.शेख याने खबर दिल्या वरून म्हसळा पोलिसांनी डंपर चालक सुशांत अनंत बिरवाडकर रा.म्हसळा कुंभारवाडा याला ताबेत घेवुन त्याचेवर आयपीसी कलम 304(अ),279,337,338 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.जे.एम.म्हात्रे कंपनीच्या मालकीचा डंपर गाडी नंबर एम.एच.46 बी.एफ.0959 चालक सुशांत अनंत बिरवाडकर चालवीत असताना चालकाच्या निष्काळजीने अपघात घडला असल्याचे  पोलीस सूत्रानी सांगितले.अपघाता बाबत अधिक तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे पीएसआय डी.टी. ठुस हे करीत आहेत.
दिघीपुणे रस्ता तयार करीत असलेल्या जे.एम.कंपनीचा कार्यभार व विस्तार मोठा असला तरी येथे प्लांटवर काम करणारे गरीब कामगार,बिगारी,कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.कंपनीच्या अवजड मालवाहतूक गाडीवर फक्त ड्रायव्हर असतो त्याला सहकारी क्लिनरची गरज असताना त्याची नेमणुक रस्ता बांधकाम सुरू असताना कुठे  दिसुन येत नाही तसेच रस्त्यावर काँक्रीट करीत असताना एकही कामगारांना हेलमेट,हँड ग्लोज किंवा अन्य शारीरिक सुरक्षाचा वापर करताना आढळुन येत नाहीत.येथे छोटा मोठाअपघात झाल्यास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली जात नाही त्यामुळे येथील सर्व कारभार बेभरोसा व दुर्लक्षित असल्याचे निदर्शनास येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा