गोंडघर मराठी शाळा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानीत.


बोर्ली पंचतन : संतोष रेळेकर 

म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परीषदेची मराठी प्राथमिक शाळा गोंडघर शाळेस जिल्हास्तरावरील द्वितीय क्रमांकाची आदर्श शाळा पुरस्कार रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते देवून नुकतेच गौरविण्यात आले. म्हसळा तालुका व श्रीवर्धन तालुक्याच्या सिमेवर असलेली रायगड जिल्हा परीषदेची मराठी प्राथमिक शाळा गोंडघर शाळेची स्थापना सन 1961 साली करण्यात आली होती त्यानंतर आता पर्यंत छोट्याषा गावातील या शाळेतून शिक्षण घेवून जाणारे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ सेवेमध्ये रूजू आहेत. विद्याथ्र्यांच्या सर्वांगिण विकासाठी नेहमीच कार्यशील असलेल्यो ह्या शाळेस सन 2015-16 मध्ये आयएसओ चे 2008-9001 मानांकन प्राप्त झाले आहे. शाळा लोकसहभागातून नुकतीच डिजीटल करण्यात आली आहे. आपल्या गावतील शाळेतून आपलीच मुले शिक्षण घेत आहेत या भावनेतून व माजी विद्यार्थी व सर्व ग्रामस्थांची या शाळेस नेहमीच सहकार्याची भावना असते. या वर्षीचा रायगड जिल्हा परीषदेकडून देण्यात येणारा जिल्हा स्तरावरील द्वितीय क्रमांकाची आदरर्श शाळा पुरस्कार या शाळेस सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, शिक्षण सभापती नरेश पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये माणगाव येथील कुणबी समाज सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार प्राप्त रायगड जिल्हा परीषदेची मराठी प्राथमिक शाळा गोंडघर शाळेचे म्हसळा सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, गटविकास अधिकारी वाय एम प्रभे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, आर डी सी सी संचालक संतोष पाटील, सरपंच लहू तुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संयुक्ता मासेकर, उपाध्यक्षा सुषमा धुमाळ, प्रतिभा तुर, सर्व समाजाध्यक्ष, मुंबई मंडळाचे पदाधिकारी, तसेच महिला मंडळ, व्यवस्थापन समिती सदस्य यांनी मुख्याध्यापक सुर्यकांत बिरवाडकर, शिक्षक सुधाकर गायकर, महेष पवार, लक्ष्मण काप यांचे अभिनंदन केले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा