प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तालुक्यातील दुर्गम भागात असलेली ही शाळा. १४/६/१९६४ रोजी स्थापन झालेली ही शाळा समाजाचा आरसा बनली असून, तिने अनेक नामवंत विद्यार्थी घडविण्याचे काम केले. आज शाळेच्या इतिहासात प्रथमच रा. जि. आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवान्वित केल्यामुळे रा.जि.प. शाळा कोकबळचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. सन २०१८/१९ चा रायगड जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार "रा.जि.प.शाळा कोकबळ, ता. म्हसळा यांना जि.प. अध्यक्षा मा. अदितीताई तटकरे, शिक्षण सभापती मा. श्री. नरेशजी पाटील, व सर्व जि.प.सदस्य, म्हसळा पं.स. छायाताई म्हात्रे, मा. सभापती उज्वला सावंत, मा. उपसभापती मधुकरजी गायकर, पं.स. गटशिक्षणाधिकारी मा. श्री. संतोषजी शेडगे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
जी शाळा म्हसळा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील निसर्गरम्य असून शिक्षण प्रवाहात परिसरातील मुलांना आणून उत्तम शिक्षा देण्याचे काम करत असून तिच्या स्थापनेपासूनच विविध शासकीय योजना, मुलांसाठी विविध उपक्रम, शालेय भौतिक सुविधा, ग्रामस्थांच्या माध्यमातून पुर्ण करून शाळेतील मुलांना आदर्श शिक्षण देण्याचे काम शाळेच्या माध्यमातून केले जाते.
या कार्यक्रमांचे व आदर्श शाळा पुरस्कारासाठीचे सर्व श्रेय रा.जि.प. शाळा कोकबळचे ग्रामस्थ मंडळ,नवतरुण मित्र मंडळ, मुंबई मंडळ, बौद्धजन मंडळ आणि शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, महिला मंडळ यांचा मोलाचा वाटा आहे. नवतरुण मंडळ व त्यांचे अध्यक्ष श्री. संतोषजी शिंदे , रमेशजी शिंदे, महेशजी शिंदे यांच्या माध्यमातून सर्व प्रकारची आर्थिक मदत शाळेला मिळाली असून त्यामुळेच हा पुरस्कार मिळवण्यासाठी सर्व निकष पुर्ण करु शकलो.
शाळेला उत्तम सहकार्य व मार्गदर्शन समाजनेते मा. दिलीप मांडवकर, मा. सरपंच पांडुरंग मांडवकर, रामजी मांडवकर, सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, तसेच मुंबई व नवतरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष शिंदे, अाणि त्यांची सर्व कमिटी,तसेच केंद्रप्रमुख मा. सुनिल पवार यांचे लाभले.
शाळेतील शिक्षक श्री. अशोक सहाणे हे गेली २/३ वर्ष एकच शिक्षक शाळेवर होते. तरीही शाळेची गुणवत्ता कमी होऊ न देता शाळेला पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. श्री. लोंढे सर, ग्रामस्थ, SMC, यांनी शाळेसाठी विशेष परिश्रम व मेहनत घेऊन मिळवलेल्या पुरस्काराने शाळेचे तालुक्यात कौतुक होत आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास मा. दिलीप मांडवकर, पांडुरंग मांडवकर, सदा भुवड, नरेश येलवे, नथुराम शिंदे, SMS अध्यक्षा सौ. प्रिती रवी राणे, उपाध्यक्षा सौ. कांचन शिंदे, सौ. रंजिता शिंदे , ग्रां.पं. सदस्या सौ. नम्रता शिंदे, सौ. बिनल मांडवकर व शिक्षक अशोक सहाणे सर, लोंढे सर व शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment