संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरासाठी वेगवेगळ्या योजनांमधून अनेक विकास काम होत असली तरी सदोष व दुर्लक्षीत गोष्टींमुळे म्हसळा करांच्या आरोग्यावर घाला होत आहे. म्हसळा शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या ( तहसील , वन विभाग कार्यालय, पोलीस स्टेशन, उप- कोषागार, मंडळ व तलाठी कार्यालय ) सौचालय व स्वच्छता गृहांतून मैल्याचे सांडवणीचे पाणी कार्यालयाचे मुख्य मार्गावर येत आसल्याने संपूर्ण कार्यालयभर मोठया प्रमाणात दुर्गंधी होत असल्याचे चित्र आहे.
वास्तविक पहाता म्हसळा नगरपंचायतीने शहरांत स्वच्छता आसावी, संडास, मुतारीचा वापर पुरेपूर व्हावा यासाठी म्हसळा शहरांतील शासकीय भींतींवर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी घोषणा लिहील्या आहेत व फार मोठा आर्थिक निधी खर्च केला आहे परंतु दिव्या खाली आंधार असल्या प्रमाणे वरुन किर्तन आत तमाशा अशी स्थिती म्हसळा शहरातील स्वच्छतेची आहे. नगरपंचायतीकडे शहरांतील सार्वजनिक व नागरी स्क्छतेची तपासणी करण्यासाठी एक निरीक्षक आहे तरी बहुतांश ठीकाणी दुर्लक्षच होत असते. त्याच पध्दतीने शासकील इमारतींची देखभाल, दुरुस्ती व स्वच्छतेबाबत कामे करायची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असुनही या होघांचेही नागरीकांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष होत आसल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
कार्यालयांतील सार्वजनीक सौचालयांची झालेली दुरावस्था नगरपंचायत व P. W.D. याना कळविणार आहोत.
-के.टी. भिंगारे, नायब तहसीलदार म्हसळा
म्हसळा शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या ( तहसील , वन विभाग कार्यालय, पोलीस स्टेशन, उप- कोषागार, मंडळ व तलाठी कार्यालय ) सौचालय व स्वच्छता गृहांतून मैल्याचे सांडवणीचे पाणी कार्यालयाचे मुख्य मार्गावर येत आसल्याने संपूर्ण कार्यालयभर मोठया प्रमाणात दुर्गंधी होत असल्याचे चित्र आहे.


Post a Comment