म्हसळयात निवडणुक आयोगाचे आचार संहितेचे पालन होणार


संजय खांबेटे : म्हसळा
लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने म्हसळा तहसीलदार यांच्या दालनात तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी  व पत्रकारांच्या सभेत  निवडणुक आयोगाचे आचार संहितेचे परिपूर्ण पालन करणार असल्याचे आश्वासन उपस्थित राजकीय पक्षाचे अध्यक्ष व पत्रकारानी दिले. निवडणूक नायब तहसीलदार नामदेव मोरे व नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने आचारसंही तेचे पालन व मिवडणूक कालावधीत काय करावे काय करु नये याबाबतची माहीती अे.पी. आय. प्रविण कोल्हे व मोरे यानी दिले . यावेळी भाजपाचे ता. अध्यक्ष शैलेश पटेल, भालचंद्र करडे, शिवसेनेचे  महादेव चांगू पाटील, कृष्णा म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर, अंकुश खडस, सचिव अशोक काते, रामदास रिकामे, काँग्रेस ( आय)चे महादेव भिकू पाटील,शेकापचे श्रीपद धोकटे, आर.पी.आय. चे राजेश तांबे, भारीप (V.B.A), महेश येलवे, सुनील नाईक, विनोद साळवी आदी विविध राजकीय पक्षाचे सदस्य आस्थित होते, यावेळी निवडणुक आयोगाचे आचार संहितेचे परिपूर्ण पालन करणार असल्याचे आश्वासन उपस्थितानी दिले." आचारसंही तेचे पालन व मिवडणूक कालावधीत काय करावे काय करु नये " याबाबतची परिपूर्ण माहीती आयोगाने शासकीय यंत्रणेला करून देणे आवश्यक आसल्याचे अभ्यासू मत शिवसेनेचे महादेव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर. यानी मांडले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा