लोकसभा निवडणूक २०१९ : निवडणूक आयोगाने वस्तुस्थितीवर आधारीत दर केले फिक्स


 खर्चाबाबत निवडणूक आयोगाने केले दर निश्चित.

( म्हसळा प्रतिनिधी )

  मागील वेळीपेक्षा विविध क्षेत्रांत महागाई वाढल्याचे  चित्र दिसत असल्याने निवडणूक आयोगाने अनेक वस्तूंच्या दरांत वाढ केली आहे त्याबाबत लोकसभा मतदार संघाचे  दरपत्रक काढले आहे. उदा .मागील निवडणुकीला ५ रु भाडे आसलेल्या खुर्चीला आता रु१० व व्ही.आय.पी. खुर्चीचा दर रु ४०वरुन रु१५० झाला आहे. हे दर निवडणूक विभागाने नाविन बनविलेल्या दरपत्रकात नमूद आहेत.
   २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या वेळी प्रथमच प्रचारक, मतदार प्रतिनिधी , मतमोजणी प्रतिनिधी याना भत्ता लागू करण्यात आला आहे. त्यांचेही आयोगाने दर दिल्याने त्याबाबत राजकीय पक्षांची चर्चा आहे.
    लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा आता रु ७० लाख करण्यात आली आहे. २०१४ पर्यंत उमेदवार वस्तु व त्यांचे दर स्वताच तडजोडीने लिहीत असत व हिशोब सादर करीत असत , यावर निवडणूक आयोगाने बाजारपेठेचे सर्वेक्षण करून लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने निगवडणुकीला लागणाऱ्या बहुतांश बाबींचे बाजारांत सर्वेक्षण करून विविध वस्तू व सेवांचे दरपत्रक जिल्हा निवडणुक विभागाने जाहीर केले आहे. उमेदवार व राजकीय पक्षांचे विविध खर्चाचा बारकाईने अभ्यास करून सुमारे ८० ते ९० वस्तू व सेवांचे दर निवडणूक विभागाने जाहीर केले आहेत यामध्ये उदबत्ती, नारळ, हार -फुले , हॉटेल भाडे, बँड-खालू- बेंजो पथक, कार्यकत्यांचा नाष्टा, प्रचारक, मतदार प्रतिनिधी , मतमोजणी प्रतिनिधी याना भत्ता निश्चित  करण्यात आला आहे. यामध्ये वाहनचालकाला रु ३०० भत्ता धरण्यात आला आहे. उमेदवारानी केलेला खर्च हा  या शासकीय दपत्रकाप्रमाणेच सादर करावा लागणार आहे.

" निवडणूक विभागाने स्थानिक बाजारपेठ , व्यापारी व राजकीय पक्ष प्रतिनिधींजवळ चर्चा करून सेवा व वस्तुंबाबत दरपत्रक (Ratecard) तयार केले आहे. त्यामध्ये लाउडस्पीकर चा दर पूर्वी  रु७०० होता त्यात वाढ केली आहे. राजकीय पक्ष किंवा उमेदवार वाटत असलेल्या मतदान स्लीप चा दर पूर्वी रु २ होता आता रु ५ केला आहे. शूटींगचा दर रू ५०० वरून रु ८०० किंवा जास्त केला आहे."

     लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आचार संहिता सुरू आहे, रायगड लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चीतीनंतर दरपत्रक उमेदवाराना देण्यांत येणार आहे असे निवडणुक विभागाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा