म्हसळा (बाबू शिर्के)
म्हसळा तालुका युवासेनाचे संपर्क प्रमुख व युवा नेते संदीप डोंगरे यांचं काल वयाच्या ४० व्या वर्षी एका दीर्घ आजाराने त्यांच्या आंबेत येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी चार मुले,दोन भाऊ भावजय असा परिवार आहे.मुंबई येथील डोंबिवली परिसरात ते कामाच्या स्वरूपात वास्तव्याला असताना आजारपणाच्या काळात ते मध्यंतरी गावीच विश्रांतील आले असता त्यांची काळ अखेर प्राणज्योत मावळली त्यांच्या जाण्याने आंबेत खाडीपट्टा तसेच तालुक्यातून एक तरुणांचं आधारस्तंभ हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे,नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेला यश प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा असल्याचं देखील अनेक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणी एक निष्ठावंत कार्यकर्ता गेल्याचे दुःख व्यक्त केले.

Post a Comment