संजय खांबेटे : म्हसळा
लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राखीत निर्भय व निपक्ष वातावरणात पार पाडण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीना जिल्हा,तालुका , शहरांतून तडीपार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुसरीकडे परवाना धारक शस्त्रधारकांकडील शस्त्रे पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश आहेत. जिल्हयांत २६ पो.स्टेशन अंर्तगत १७२५ शस्त्र परवाना धारक आसल्याचे जिल्हा स्था. गु. अ. विभागाकडून सांगण्यात आले. ९ मार्च २०१९ पासून आचारसंहीता सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुक तटस्थ, पारदर्शक आणि भयरहीत पार पडावी म्हणून अशा पद्धतीच्या उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असतात त्याचा भाग म्हणून जिल्ह्यात परवाना असलेल्यां कडून शस्त्र संबधीत पोलीस ठाण्यांमध्ये जमा करून घेयची प्रक्रिया सुरु आहेत. २८ मे पर्यंत आचार संहिता रहाणार आहे.जिल्ह्यांत ८ उ. वि.पो. अ. कार्यालय व त्यांच्या अधिपत्या खाली २६ पोलीस स्टेशन आहेत.
"म्हसळा तालुक्यात ७३ शस्त्र परवाना धारकांकडे ७९ शस्त्रे आहेत त्यामध्ये रिव्हलवर ३ , बंदूक ७१ व स्पोर्टस गन ५ आहेत"

Post a Comment