नियमित व्यायाम व योगाभ्यास महिलांना आवश्यक - फाल्गुनी मेथा
श्रीवर्धन : संतोष सापते
आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे .त्या कारणे विविध प्रकारच्या आजारांनी स्त्री त्रस्त आहे .स्त्री ने निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम व योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे डॉ फाल्गुनी मेथा यांनी सांगितले .श्रीवर्धनच्या एस एन डी टी महाविद्यलयात महिला दिनी "स्त्री आरोग्य व समस्या " या विषयावर मेहता यांनी विदयार्थीनीशी संवाद साधला .
स्त्रियांच्या दैनंदिन जीवनात मोठया प्रमाणात बदल घडला आहे .त्या मुळे वेळेच्या वेळी जेवण ,झोप या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे .शरीरातील हॉर्मोन्सच्या पातळीत त्या कारणे अनेक बदल घडतात .पोट दुखी ,डोके दुखी ,ताप येणे या नित्याच्या बाबी झाल्या आहेत .नोकरी ,व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलांचे वजन अतिशय कमी झाल्याचे दिसून येते .कॉलेज तरुणी मध्ये विविध आजार वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे .हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तदाब व रक्तप्रवाहासाठी अडचणी निर्माण होत आहेत .फास्ट फूड खाण्याची सवय वाढत आहे. आरोग्य विषयी आज ही स्त्री सतर्क व सजग असल्याचे दिसून येत नाही ही चिंतेची बाब आहे .कॉलेज तरुणी नी आपल्या समस्या विषयी योग्य व मार्मिक सल्ला घेणे अभिप्रेत आहे. स्त्री ने वेळीच उपचार घेतल्यास कोणतीही समस्या निर्माण होणार नाही .असे फाल्गुनी मेथा यांनी सांगितले. सदर कार्यक्रमासाठी कॉलेज समनव्यक प्राध्यापक अनिल वाणी ,तृप्ती विचारे ,अक्षता तोडणकर व मोठया संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध्रुवा पटेल या विद्यर्थिनींनी केले .


Post a Comment