म्हसळा शहरात 75 लक्ष रुपये निधीच्या विकास कामांचे आमदार अनिकेत तटकरे यांचे हस्ते भुमिपुजन.


संजय खांबेटे म्हसळा 
म्हसळा नगरपंचायतीची एक हाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने "म्हसळा शहराचा विकास हाच ध्यास "असे वचन पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांनी दिल्या नुसार शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांमधुन गेल्या अडीच वर्षाचे कालावधीत करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील अंतर्गत विकास कामांसाठी नगरोत्थान योजने मधुन 1 कोटी 13 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीमधून मंजुर झालेली शहरातील अंतर्गत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते दिनांक 7 मार्च रोजी करण्यात आला.भूमिपूजन कार्यक्रमात आमदार अनिकेत तटकरे यांच्या समावेत जेष्ठ नेते बाळशेट करडे,राष्ट्रवादी रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष नाझीम हसवारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,भाई दफेदार,उप सभापती संदिप चाचले, नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,माजी नगराध्यक्षा कविता बोरकर,माजी उपनगराध्यक्ष नसीर दळवी,नगरसेवक करण गायकवाड , संतोष काते,संजय दिवेकर,नगरसेविका जयश्री कापरे,शहनाज हुर्जुक,शहराध्यक्ष रियाज घराडे,शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कापरे,महिला शहरा ध्यक्षा शगुफ्ता जहांगीर,शहर युवक अध्यक्ष नईम दळवी, सलीम बागकर,सतीश शिगवण, अनिल बसवत,लहू म्हात्रे,सरपंच अंकुश खडस,गजानन पाखड,भाई बोरकर,संतोष सावंत,सुभाष वाळवटकर आदि शहरातील  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी सावरफाटा ते सावरगाव रस्ता डांबरीकरण करणे, हासिया काजी यांच्या घरापर्यंत गटार बांधणे, कन्याशाळा परिसर रस्ता कॉंक्रिट करणे व गटार बांधणे,सुभाष वाळवटकर यांच्या घरा समोरील रस्ता काँक्रीटीकरण करणे, तबरेज काठेवाडी ते आयशा आप्पी यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण,सचिन गुरव घरासमोरील रस्ता कॉंक्रिट करणे,हसीना अपार्टमेंट ते जमात गेट अंतर्गत गटार व रस्ता काँक्रीटीकरण,शिरशिकर गॅरेजपासून ते आयशा मंझील रस्ता कॉंक्रिटीकरण, गवळवडी ते चिराठी पर्यंत डांबरी रस्ता,
बाजारपेठ रस्ता काँक्रीटीकरण,पोष्ट ऑफीस परिसरात रस्ता काँक्रीटीकरण,साळीवाडा अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण,जामा मज्जीद परिसरात रस्ता काँक्रीटीकरण,फारुख पेणकर यांच्या घराशेजारी रस्ता डांबरीकरण,आदिवासीवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीट करणे,गवळवाडी पाण्याची टाकी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण,गवळवाडी स्मशानभूमी सुधारणा,दत्ता हेंगिष्टे यांचे घरा शेजारी रस्ता काँक्रीटीकरण,मच्छी मार्केट रस्ता काँक्रीटीकरण, दुर्गवाडी येथे गटार बांधकाम करणे, गणपती विसर्जन घाट रस्ता बांधकाम करणे,कुडेकर काँप्लेक्स कडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण, म्हसळा शहरातील हमरस्त्यावरील गटार बांधकाम करणे,चिराठी येथे स्मशानभूमीत शेड बांधकाम करणे आदी विकास कामांसाठी सुमारे 1 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे या निधीमधून 40 लक्ष रुपयांची कामे पुर्ण झाली आसुन 70 लक्ष रुपयांचे शहरातील अंतर्गत सर्वच कामाचे भूमिपूजन आमदार अनिकेत तटकरे यांनी करून हि कामे लवकरात लवकर लोकार्पण होतील असे आश्वाशीत केले.विशेष बाब म्हणुन म्हसळा हिंदु स्मशानभूमी नुतनीकरण काम सुरू आहे या कामासाठी सुनिल तटकरे यांनी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर चर्मकार समाज सामाजीक सभागृहासाठी 5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.म्हसळा शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 'सुशोभिकरणात भर पडली असल्याने आणि शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता आणि नागरिकांनी पक्षाचे नेते सुनिल तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांचे आभार मानुन धन्यवाद दिले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा