लोकसभा निवडणुक तयारी अंतीम टप्प्यात : तालुक्यात २ मतदान केंद्र वाढणार



तालुक्यात पुरुष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांचे प्रमाण जास्त

संजय खांबेटे : म्हसळा

       म्हसळा तालुक्यात ७० मतदान केंद्रे असुन नव्याने २ केंद्रे वाढण्याची शक्यता आहे. आज ७० मतदान केंद्रात एकूण मतदार ४९,१६४ आहेत . पुरुष मतदार २३५२५ , स्त्री मतदार २५६३९ आहेत. यामध्ये ५२३ दिव्यांग मतदार आहेत. तालुक्यातील ७० मतदान केंद्रातून ईव्हिएम- व्हिव्हिपॅट बाबत मशीनची जोडणी, सुखात , मतदान करणे  व  VVPATs मध्ये दिलेल्या मतदाना बाबत खात्री करणे याची परीपूर्ण माहीती दिली आसल्याने बहुतांश मतदारांची मतदान प्रक्रियेबाबत खात्री पटली आहे. त्यामुळे मतदारांच्या पूर्ण शंकाना पूर्ण विराम मिळाला आहे.
       ज्या मतदान केंद्रावर मतदार संख्या १२५० पेक्षा जास्त आहे त्या मतदान केंद्राचा भाग करण्यात यावा जेणेकरून मतदान प्रक्रिया सुकर , पारदर्शक व गतीमान होईल  आशा मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाच्या आसल्याने म्हसळा तालुक्यातील २३४ पाभरे १ एकूण मतदार १३१० व ३२६ पांगलोली एकूण मतदार १३०५ यांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जवळ विचार विनीमय करून निर्णय घेण्यात येणार आहे.

 मतदान वाढविण्याचे होणार प्रयत्न

. भारत निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर (District Contact Centre) दिनांक 25 जानेवारी, 2019 पासून कार्यान्वित करण्यात आले आहे.  त्यासाठी 1950 हा टोल फ्रि क्रमांक देण्यांत आला. 2 व 3 मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबवून आयोगाचे माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी दिव्यांग मतदारांची नोंदणी, त्याना मतदान केंद्रापर्यंत नेणे व परत सोडणे आशा पद्धतीची सेवाही आयोगाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आसल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा