श्रीवर्धनमध्ये शेकाप स्वबळावर लढणार ; राष्ट्रवादीकडून दिली जातेय अपमानास्पद वागणूक



श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहिती शेकापचे श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव यांनी दिली . जिल्ह्यामध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्ष या दोन पक्षाची आघाडी असली तरी मात्र श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तसे होताना दिसणार नाही . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला आम्ही नेहमीच मोठ्या भावाच्या नात्याने सतत सन्मान देत असतो . मात्र त्यांच्याकडून लहान भावाला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे . अशाप्रकारे नेहमीच सतत वागणूक दिली गेल्याने जो उद्रेक व्हायला हवा होता , तशाप्रकारे सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकत्यांचा आज झाला आहे . त्यामुळे आगामी निवडणुकांमये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सन्मानजनक वागणूक दिली नाही , तर श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे . धोरण म्हणून स्थानिक पातळीवर इतर मित्रपक्षांना विकास साधण्यासाठी सोबत करुन श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक लढविणार आहोत . येत्या दोन दिवसांत सर्व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा श्रीवर्धनमध्ये घेण्यात येणार आहेत . आम्हाला अपमानास्पद वागणूक अशाच पद्धतीने देत राहिल्यास याचा परिणाम भविष्यामध्ये लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो , असा इशारा देतानाच वेळ आली तर आमची ताकद दाखवून देऊ असेही शेकापचे श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव यांनी स्पष्ट केले आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा