श्रीवर्धन क्रीडा संकुल ६ वर्षानंतरही अपूर्णच



बोल पंचतन : अभय पाटील
बोर्ली पंचतन येथे श्रीवर्धन तालक्याचे क्रीडा संकुलाचे काम मागील वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू असून काम करत असलेल्या ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्याने अपूर्ण असलेल्या इमारतीमध्ये तळीरामांनी आपला अड्डा बनविला असून दारूच्या बाटल्या इमारतीमध्ये पडल्या आहेत . गेली ६ वर्षा पासून सुरू असलेले हे काम पूर्णत्वास केव्हा जाणार असा प्रश्न परीसरातील क्रीडा प्रेमींना पडला आहे तर ठेकेदारास सार्वजनिक बांधकाम खाते पाठीशी घालत असल्याची चर्चा क्रीडा प्रेमींमध्ये आहे .  श्रीवर्धन तालुक्याचे क्रीडा संकुलासाठी तत्कालीन पालकमंत्री सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने शासनाकडून १ कोटीचा रूपयाचा निधी मंजूर झाल्यानंतर ३ मे २०१३ रोजी क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले व प्रत्यक्ष कामास २०१४ मध्ये सुरूवात करण्यात आली या कामाचा ठेका सिरोया कन्स्ट्रक्शन कंपनी श्रीवर्धन यांना देण्यात आला आहे . क्रीडा खात्यामार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे टप्याटप्याने आजपर्यंत कोटी रूपये वर्ग झाल्यानंतर देखील मागील वर्षभर क्रीडा संकुलाचे काम बंद आहे . क्रीडा संकुलाचे काम आतापर्यंत ७० टक्केच पुर्ण असून निधी पुर्ण आल्यानंतर देखील भूमिपुजनानंतर काम ६ वर्षे सुरू असल्याने ठेकेदाराचे अन्य ठिकाणी काम चालू असल्याने येथील कामाकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे . त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांचे ठेकेदारास अभय तर नाही ना ? अशी कुजबुज परीसरारामध्ये आहे . श्रीवर्धन तालुक्याचे क्रीडा संकुल बोर्ली पंचतन येथे होण्यासाठी गेली अनेक अडचणींतून मार्गक्रमण करीत होते महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत १ कोटी निधीचे श्रीवर्धन क्रीडा संकुल बोलपंचतन येथे होणेसाठी क्रीडा संकुलास प्रथम जागेची अडचण होती परंतू बोर्ली पंचतन येथील दानशूर रविंद्र नारायण कुळकर्णी यांनी क्रीडा संकुलासाठी १०० गुंठे जागा शासनास क्रीड़ा संकूलासाठी बीना मोबदला बक्षीस पत्र केली त्यामुळे बोर्ली पंचतन येथील क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला. क्रीडा संकुलाच्या इमारतीचे बांधकाम ७० टक्के पुर्ण झाले असल्याने इमारत गावाच्या एका बाजूला असल्याने निवांतक्षणी या इमारतीचा वापर परीसरातील तळीराम आपल्या सोयींनी करित आहेत इमारतीमध्ये दारूच्या बाटल्या पडल्या असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदार यांनी या क्रीडा संकुलाच्या बांधकामाकडे लक्ष पुरवून काम पुर्ण करावे व क्रीडा प्रेमींना हे लवकरात लवकर खेळ खेळण्यास खुले करावे अशी मागणी जोर धरीत आहे तर बांधकाम खात्याने काम त्वरीत सुरू न केल्यास बांधकाम खात्याच्या विरोधात आंदोलन छेडण्याची वेळ क्रीडाप्रेमींना आणून देवू नये असे क्रीडाप्रेमींनी आवाहन केले आहे . 

येत्या काही दिवसांमध्ये क्रीडा संकुलाच्या कामास सुरुवात होईल व  पुढील महिन्यांमध्ये संकुलाचे काम पूर्ण होईल.
-श्रीकांत गंगावणे, उप अभियंता श्रीवर्धन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा