जलयुक्त शिवाराने म्हसळा झाले जलसमृद्ध ; लोकसहभाग तसेच शासन नियोजनाचा फायदा



म्हसळा : महेश पवार
शासनाच्या २०१२ - १३ च्या शासन निर्णयानुसार राज्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावोगावी पाण्याचे नियोजन करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने ह्या योजना पूर्ण करण्यास यशस्वी झाल्या आहेत , म्हसळा तालुक्यात बंधारे बांधून गावात होणारी तीव्र पाणीटंचाई आज दूर झाली आहे .  आजपर्यंत तालुक्यात खामगाव , गौलवाडी , मेंदड़ी कोंड , म्हसळा , खरसई , संदेरी , गडदाव , चंदनवाडी , केलटे , आडीठाकुर या गावामधून सलग २७३ . १२ हेक्टर दगडी बांध ४४७ नग , गौनियत बांध ३८ नग , सिमेंट बांध ४ , ग्रामीण पाणी पुरवठ्यामार्फत मेंदड़ी कोंड येथील पाझर तलाव गाळ काढणे व दुरुस्ती करणे तसेच ८ नवीन विहिरीची उभारणी अशी एकूण २५३ . १७ कामे करण्यात आली आहेत . चालू वर्षीही विभागामार्फत दगडघुम , घूम आणि कुडगाव या सलग समतल चर १५१ . ८ हेक्टर , दगडी काम ५५७ नग , गौनियत बांध १६ नग सिमेंट बांध दुरुस्ती ३ , सिमेंट बांध २ तर ग्रामीण पुरवठ्यामार्फत ३ विहिरींची कामे हाती घेण्यात आली आहेत , तालुक्यातील पाणी प्रश्नावर तालुक्यातील कृषी प्रशासनाने कटाक्षाने लक्ष दिले आहे . शासन निर्णयानुसार पाणी आडवा पाणी जिरवा ह्या योजनेचा आरंभ करित शासनाच्याही निकर्षानुसार काम केले आहे .  राज्यात सतत उद्भवणारी टंचाई नियोजनबद्ध परिस्थिती विचारात घेऊन पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे . या अभियानात विविध विभागाकडील योजना , अशासकीय संस्था आणि लोकसहभाग यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे . अपु - या आणि अनियमित पावसामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित विचारात परिणाम होतो . या बाबी राज्याच्या विकासात एक आव्हान ठरत आहेत . राज्यात गेल्या ४ दशकात पाण्याच्या पुरेशा उपलब्धीअभावी कोरडवाह क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येतो . निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी शासनाच्याही परिस्थिती बदलण्यासाठी हे अभियान एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करित आहे . हे अभियान राबविल्यास पिण्याचे पाणी पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे निर्माण होईल . गेल्या २ वर्षात राज्यात पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी जलसंधारणाच्या राबविलेल्या विविध प्रणालीमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे . या सर्व कार्यक्रमाची फलश्रुती विचारात घेऊन जलयुक्त शिवार अभियान राज्य शासनाने प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे . नवीन वर्षातील जानेवारीमध्येच राज्याच्या सर्व तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे सुरू करण्याचा निर्धार शासनाने केला आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा