अंतुले पुत्र नाविद शिवसेनेच्या मतात भर टाकणार का श्रीवर्धन मतदार संघात स्पर्धेत येणार?
संजय खांबेटे म्हसळा
२०१९ ची रायगड लोकसभा निवडणुक ही शिवसेनेचे विद्यमान खासदार व मंत्री असलेले अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस सुनील तटकरे या दोघानाही प्रतिष्ठेची ठरणार आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ६८ मते, शेकापच्या रमेश कदम यांना १ लाख २९ हजार ७३० मते पडली. याशिवाय अपक्ष उमेदवार सुनील तटकरे यांना ९८४४ तर मुस्लीम समाजाचे अपक्ष उमेदवार मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी ऊर्फ मोदी यांना ९८१४ मते पडली या दोघांची मते राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्या पराभवासाठी निर्णायक ठरली. त्यामुळे मत विभाजनाची कोणतीही संधी या वेळी तटकरे विरोधकाना देणार नाहीत . रायगड लोकसभा मतदार संघात बहुजन विकास अधाडी चे प्रकाश आंबेडकर व ओवोसी उमेदवार उभा करणार असल्याने तटकरेना तो फार मोठा अडसर ठरणार आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड हे चार विधानसभा मतदार संघ व रत्नागिरी जिल्ह्यांतील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ येतात. यापैकी पेण व आलिबाग हे दोन मतदार संघ शेतकरी कामकरी पक्षाकडे, श्रीवर्धन, दापोली आणि गुहागर हे तीन मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. पक्षीय बलानुसार व ५६ पक्षाचे महाआघाडी नुसार शेकापक्ष ,काँग्रेस ( आय) , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांचे सोबत असल्यामुळे ह्यावेळी तटकरे याना सोपे जाणार असे चित्र दिसत असले तरी मागील पाच वर्षाचे कालावधीत केंद्र व राज्य शासनानी घेतलेले धोरणात्मक निर्णय , पुलवामा दहशतवादी हल्लाला एअर सर्जिकल स्ट्राईकने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे सर्वसामान्य मतदार " मै भी चौकीदार हूँ " " मोदी है तो मुमकीन है " करीत " मोदी अगेन " च्या नाऱ्यांत मोठया प्रमाणात सामील झालेले दिसत आहेत, तसा प्रचारही सुरु आहे. त्याचा फटका तटकरेंना कितपत बसणार हे अवघड गणित आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाला विशेष महत्व ...
रायगड लोकसभा क्षेत्रांत येणारा श्रीवर्धन मतदारसंघाची भूमिका दोनही उमेदवारांसाठी महत्वाची आहे. या मतदारसंघातून २००९ चे विधानसभेला सुनील तटकरे यानी १०८७१ मताधिक्य घेतले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून तटकरे याना सुमारे २८०० मताधीक्क मिळाले . नंतर झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अवधुत तटकरे याना केवळ ५५ मताधीक्क मिळाले. शिवसेना विजयी झाली नसली तरी सेनेला मताधिक्क कमी करण्यात यश आले आहे. १९९५ पासून २००९ पर्यंत शिवसेनेच्या ताब्यात असलेला श्रीवर्धन मतदार संघ २००९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनील तटकरे यानी ताब्यात घेतला , राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारानी मतदारसंघाला पाठ फीरवल्याने , राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदानावर थोडाफार परीणाम होण्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. मतदार संघात जिल्हा परीषद अध्यक्षा आदीती तटकरे, विधान परीषद सदस्य अनिकेत तटकरे, श्रीवर्धन, म्हसळा . तळा, रोहा येथील जिल्हा परिषद पं.संमधील निर्विवाद सत्ता . श्रीवर्धन,रोहा या नगर पालीका माणगाव , म्हसळा या नगरपंचायती मधील राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता मताधिक्क देणार का ?का लोकसभे साठी शहरी मतदार गितेंच्या माध्यमातून मोदी अगेन चा नारा देणार? अशी चर्चा आहे.
दुसरीकडे श्रीवर्धन मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून किमान ७-८ जण इच्छुक असल्याचे समजते . त्यामध्ये माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचे पुत्र नावीद अंतुले यानी शिवसेनेचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे समवेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन संकेत दिले. श्रीवर्धन मतदार संघात सध्य स्थितीत श्रीवर्धन मधून सुजित तांदळेकर, तळा तालुक्यातून बाळशेठ लोखंडे, रवी मुंडे, म्हसळा तालुक्यातून महादेव पाटील, रोहा तालुक्यातून समीर शेडगे, माणगाव तालुक्यातून राजीव साबळे, अनील नवगणे हे इच्छुक आसल्याचे समजते. ही सर्व मंडळी मतदार संघात फार उत्साहाने काम करीत आहेत. मागील १० ते १५ वर्षे सुनील तटकरे मतदार संघातील प्रत्येका जवळ प्रचंड संपर्कात आहेत.व्ययक्तीक, सामाजिक पातळी पासून ते थेट तालुका , वाडी, वस्ती व ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालीका , पंचायत समीती अशा सर्व स्वरावर संपर्कात आहेत व करोडो रुपयांची मतदार संघात विकास कामे केली आसल्याने श्रीवर्धनचे मताधीक्क हे सुनील तटकरे याना विजयाकडे नेणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या मंडळींसोबत तटकरे यांचे मनोमीलन झाले आसल्याने त्याचा फार मोठा फायदा तटकरेना होण्याची शक्यता आहे.
रायगडांत "नोटाची " सुध्दा आहे भिती
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रायगडात गीते, तटकरे आणि कदमां पाठोपाठ नोटाही जोरात चालल्याचे दिसून आले. प्रस्तापित राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांवर असलेला राग मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे दिसून आले. रायगड मतदारसंघात २० हजार ३५१ मतदारांनी मतदानाचा नकाराधिकार वापरल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना याची गंभीर दखल घ्यावी लागणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

Post a Comment