प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता उपक्रम, तालुक्यात प्रत्येक गावात वाडीत , वस्तीत असणान्या ११७ स्मशानभूमी स्वच्छ करण्याचे काम डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून केले . श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ . आप्पासाहेब धर्माधिकारी व विशेष रायगड भूषणप्राप्त सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी २४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून या स्वच्छता अभियानाची सुरवात करण्यात आली . स्वच्छता करण्यासाठी श्री प्रतिष्ठानचे एकूण २ , १४९ श्रीसदस्य यांनी परिश्रम घेतले . सकाळपासून सुरु झालेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये गावातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला . म्हसळा तालुक्यामध्ये ३२ ग्रामपंचायती व १ नगरपंचायती मधील ७५ स्मशानभूमी तर तुळा तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील १० स्मशानभूमी माणगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीमधील ३० स्मशानभूमी व श्रीवर्धन १ ग्रामपंचायत मधील २ स्मशानभूमी अशा तब्बल ११७ स्मशानभूमीसाठी असणारा ३ , ८१ , १५६ चौ . मी . परिक्षेत्रातील परिसर स्वच्छता करून एकूण ५६ टन कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचा आदर्श सर्वसामान्य नागरिकाला श्री प्रतिष्ठानने दिला आहे . मोहिमतगत आज पर्यत श्रीप्रतिष्ठानने तालुक्यात समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचे महान कार्य वळावेळी केले आहे . स्वच्छता माणसाचे आत्मदर्शन घडविते याचे जिवंत उदाहरण श्री प्रतिष्ठानने प्रत्येक मानवाच्या अंतकरणामध्ये उमटविण्याचे कार्य केले आहे , या स्वच्छत मोहिमेत स्मशानातील कदापी न काढला जाणारा कचरा काढल्याने नागरीकातून श्री प्रतिष्ठानचे आभार व विशेष कौतुक होत आहेत . म्हसळा तालुक्यामध्ये ३२ ग्रामपंचायती व नगरपंचायती मधील ७५ स्मशानभूमी तर तळा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीमधील १० स्मशानभूमी माणगाव तालुक्यातील १ ग्रामपंचायतीमधील ३० स्मशानभूमी व श्रीवर्धन १ ग्रामपंचायत - ३ स्मशानभूमी अशा तब्बल ११७ स्मशानभूमीसाठी असणारा ३८१ , १५६ची . मी . परिक्षेत्रातील परिसर स्वच्छता करून एकूण ५६ टन कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली .
ग्रामपंचायती अंतर्गत स्वच्छता केलेल्या स्मशानभूमी...
म्हसळा तालुक्यातील तुरुवाडी १ , रोहिणी १ काळसुरी १ वारळ २ , मेंदड़ी ३ , खरसई १ , रेवली १ वरवटने १ . तोंडमारे १ खारगाव खुर्द १ , कोलवट ५ , खामगाव ४ . लेप २ , बेकऱ्याचा कोंड ३ , खारगाव बुद्रुक २ . म्हसळा नगर पंचायत ७ देवघर ३ चिखलप०४ , घोणसे ३ . कांदळवाडा १ . सालविडे २ , मादाटने ६ . पांगळीला १ , कुडगाव १ , कोळे ३ , केलटे २ . नेवळ १ , ठाकरोळी ३ . घूम २ . पाभरे ४ , निगड़ी २ , माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हरकोल २ मांजरोणे १० , साई ५ , फळराप १ वडवली १ , डोंगरोली १ . कुमशेत ३ , चांदोरे ६ गावेले ५ , तळा तालुक्यातील ग्रामपंचायत वाशी हवेली ३ , मजगाव २ वरळ वांजलोशी १ , कुंभले १ , श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायत गाणी २ .

Post a Comment