तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना ठप्प,8 गावे 4 वाड्या टंचाईग्रस्त ; दुर्लक्ष केल्यास मतदानावर बहीष्कार

म्हसळा नायब तहसीलदार के.टी. भिंगारे याना निवेदन देताना महादेव पाटील व ग्रामस्थ

शासनाने त्वरीत टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी.

संजय खांबेटे म्हसळा

शासनाचे  लघु पाटबंधारे विभागाचे मार्फत  टंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाचे दुरूस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजनेवर पडला आहे या योजनेवर अवलंबून असलेली 8 गावे आणि 4 वाड्या आता टंचाईग्रस्त झाली आहेत.शासनाने तातडीने दखल घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्याबाबत मागणीचे निवेदन न.पा.पु .योजना समितीने म्हसळा नायब तहसीलदार के.टी. भिंगारे याना दिले यावेळी अध्यक्ष महादेव पाटील,उपाध्यक्ष मनोज नाक्ती,सचिव सखाराम पवार, उप सरपंच जनार्धन गाणेकर,अंकुश गाणेकर,दत्ताराम काजारे,अनंत पाटील,जहूर शिरशिकर,अ.सत्तार चाउस,अकलाक शिरशिकर,कुतुबुद्दीन गणतारे,साजिद तालिब,गोविंद भायदे,प्रकाश गाणेकर नारायण नाक्ती आदी समिती सदस्य उपस्थित होते.
 निवेदनात समितीने शासनाला तात्काळ पाणी पुरवठा करण्यासाठी दखल घ्यावी अन्यथा आम्ही ग्रामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करू किंवा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर  बहिष्कार टाकला जाईल असा इशाराही दिला आहे. तोंडसुरे,सकलप खारगाव खुर्द  रेवली,बनोटी,गणेशनगर,वरवठणे,आगरवाडा,पेडांंबे हि आठ गावे आणि जंगमवाडी,तोंडसुरबौद्धवाडी, वरवठणे कोंड,आगरवाडा येथील बौद्धवाडी या 4 वाड्यांंकरिता म्हसळा पाभरे धरणामधुन विंधन विहिरी मार्फत तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. ह्या गावाना शासनाने कृत्रिम पाणीटंचाईच्या झळीत टाकल्याच्या भावना उपस्थितानी व्यक्त केल्या.

गाव वाडीला टंचाईची झळ पोहचली की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथम गट विकास आधिकाऱ्यांकडे कळविले जाते , आमचा तोंडसुरे प्रादेशिक योजनेच्या टंचाई बाबत आमचा काहीच संबध नाही असे उत्तर देऊन ग. वि. अ. कर्तव्यापासून दूर गेले.
-ग्रामस्थ तोंडसुरे.

जा. क्रं .१/१९२ दिं .१० /१ / २०१९ रोजी कार्यकारी अभियंता पाटबंधारे  विभाग , कोलाड यानी २०१५ पासून मुख्य विमोचक बंद आसल्याने ( नादुरुस्त) कालव्याना पाणी सोडता येत नाही, तात्काळ दुरुस्तीचे काम करण्यासाठी धरणातील पाणी साठा सोडण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी ( प्रांत) व तहसीलदार यानी  टंचाई काळात तोंडसुरे प्रादेशिक व खारगाव या दोन योजना साठी पर्यायी व्यवस्था करावी असे पत्र जिल्हाधिकारी, प्रांत व तहसील दार म्हसळा या ना जानेवारी मध्ये देऊनही महसुल विभाग कानाडोळा का करीत आहे. ८ गावे व ४ वाडयांतील सुमारे ४०८० मतदारानी मतदानावर बहिष्कार टाकला तर त्याचे गंभीर परीणाम होतील.
-महादेव पाटील , अध्यक्ष तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना.

                                 पाभरे धरण

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा