ठाकरोली शाळेत विज्ञान दिन संपन्न

छाया संग्रहीत


म्हसळा प्रतिनिधी : 
तालुक्यातील पाष्टी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या ठाकरोली शाळेत विज्ञान दिन साजरा करण्यात आला . रायगड जि . प . शाळा ठाकरोली येथे मराठी येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून २८ फेब्रु . रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते . एकूण २५ प्रयोग याप्रसंगी लावण्यात आले . विद्यालयातील बालशास्त्रज्ञानी उत्कृष्ट प्रकारच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या . विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्दन पजई यांनी विद्यालयातील शिक्षक शरद कोदरे , धनेश अधिकारी आणि जीवन राठोड यांच्या सहकार्याने विज्ञान प्रदर्शनाचे चांगल्या प्रकारे आयोजन केले होते . शाळा व्यवस्थापन कमिटी चे पदाधिकारी , ग्रामस्थ यांनीही प्रदर्शनात सहभाग घेतला . पाष्टी केंद्राचे केंद्र प्रमुख गजानन साळुखे यांनी सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा