श्रीवर्धन येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप



दिघी : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले येथे कातकरी उत्थान अभियान अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले . शैक्षणिक मदत म्हणून दानशर व्यक्तींनी कार्यक्रमप्रसगी विद्यार्थ्यांना मदत देऊ केली . उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार , तहसीलदार जयराज सूर्यवंशी व सामाजिक वनीकरण अधिकारी यांच्या उपस्थितीत कातकरी उत्थान अभियान अंतर्गत कार्ले आदिवासी वाडी येथील समाज मंदिरात विविध साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला . 

प्रत्येक घटकाला प्रगतीपथावर नेण्यासाठी व शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे यासाठी अजय ठोसर व प्रवीण त्रिकंनाड या दानशूर व्यक्तींकडून कार्यक्रमप्रसंगी आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. तालुक्यातील कार्ले , कुडगाव , हरवित , कुडकी व वेळास या गावातील ४३ विद्यार्थ्यांना यावेळी सायकल वाटप करण्यात आल्या . त्याचवेळी कालें आदिवासी समाज मंदिरासाठी वसिफ वझीरी यांनी एक टेबल व १० खुर्च्या भेट दिल्या . कातकरी उत्थान अभियान अंतर्गत नागरिकांना रेशनकार्ड , जातीचे दाखले व मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा