रायगड प्रतिनिधी
संपूर्ण कोकण रेल्वेचे विद्युतीकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिली . तसेच येत्या काळात रोह्यापर्यंत धावणारी रेल्वे माणगावपर्यंत धावणार असल्याचेही त्यांनी सांगितले . अलिबाग येथे ते बोलत होते . पुढे बोलताना त्यांनी अलिबागकरांसाठी प्रवासी रेल्वे डावलून आरसीएफ कुठल्या खाजगी कंपनीशी करार करणार असेल तर तो रद्द करा ; अन्यथा कारवाईला सामोरे जा , असा सज्जड दम कद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिला आहे . पीएनपी वा पोर्टला कोणत्याही परिस्थितीत रेल्वे मार्गाची सायडिंग दिली जाणार नाही आणि कोणी असे करत असेल व अलिबाग प्रवासी सेवा थांबविण्याचा प्रयत्न करीत असाल , तर हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिली . आरसीएफ ही भारत शासनाची सार्वजनिक उपक्रम कंपनी असून कोणत्याही खाजगी कंपनीसाठी वा पोर्टसाठी स्थापन केलेला उपक्रम नाही . त्यामुळे आरसीएफने चुकीचे पाऊल टाकू नका , खाजगी कंपनीचे लाड पुरविण्याची आवश्यकता नाही . तुम्ही कारवाई करायला भाग पाडू नका , असा इशारा व्यासपीठावरून देत असल्याचे ना . गीते यांनी आपल्या भाषणात सांगितले . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस यांचे क्षेत्र हे फक्त साडेपाच तालुक्यापुरते राहिले आहेत . ग्रामपंचायत निवडणुकीत पांढरे झेंडे घेऊन फिरत असून पाढरा झेंडा हा शरणागतीचा झेंडा असल्याने निवडणुकीपूर्वीच तटकरे यांनी शरणागती पत्करली असल्याची टीका यावेळी गीते यांनी भाषणातून केली . शिवसेना मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हयातील तालव्यांना अद्ययावत रुग्णवाहिका , २० दिव्यांगाना इलेक्ट्रीक स्कुटरचे वाटप , कचरा गाडी , चेकचे वाटप तसेच ओपन जिमचे वाटप अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी , ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला . या मेळाव्याला संपर्क प्रमुख विलास चावरी , सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे , जिल्हा प्रमुख किशोर जैन , रवी मंढे , रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम , माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी , विजय कवळे , सदानंद थरवळ , राजीव साबळे , बबन पाटील , युवासेनेचे योगेश कदम तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .
तुमच्या धमक्यांना भिक घालत नाही जिल्ह्यातील दिव्यांगांना २० इलेक्ट्रॉनिक्स वाहनांचे वाटप केले. ज्या कंपनीने ही वाहूने सीएसआरमधून दिली आहे त्यांना म्हुणे रायगडातील एका नेत्यांने धमकी दिल्याचे समजले . गीतंना गाड्या दिल्यात तर मला पण द्या अशी त्याची मागणी होती . मात्र असल्या धमक्यांना भिक घालणार नाही असे गीते यांनी यावेळी म्हटले आहे केले .
कामांचा पाऊस...
◆ रेवदांडा , काशीद आणि लाडघर येथे पोर्टेबल स्वच्छतागृह
◆ शैक्षणिक संस्थाना साडेतीन कोटींची मदत
◆ एकाच दिवसात १२ रुग्णवाहिका लोकार्पण
◆ २० दिव्यांगांना इलेक्ट्रीक स्कुटर वाटप
◆ इलेक्ट्रीक कचरा गाड्यांचे वाटप
◆ फिरता दवाखाना २५ हजार लोकांना लाभ
◆ गुहागरला फिरता दवाखाना
◆ कोर्लईला इलेक्ट्रीक वाहन
◆ माणगाव येथे प्रस्तावीत लॉ कॉलेजला २५ लाख
◆कोकण रेल्वेचे विद्युतीकरण


Post a Comment