प्रसिद्ध चित्रकार वकवी चित्रकार श्री. प्रकाश पाटील यांचे लाभले मार्ग दर्शन.
म्हसळा : प्रतिनिधी
दि. ०६ मार्च २०१९ रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळवाडा येथे शा. व्य. समिती व शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्रकला कार्यशाळेसाठी पनवेलचे प्रसिद्ध चित्रकार व कवी मा. श्री. प्रकाशजी पाटील सर, कला शिक्षक मा. श्री. भारत पेंढारकर सर, म्हसळा पंचायत समितीचे गटसमन्वयक श्री . साळूंखे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.रश्मी कुले, माजी अध्यक्ष श्री संतोस पाखड, कांदळवाडा ग्रां. पं. सरपंच सौ. धोंडीबाई चालके, गाव कार्याध्यक्ष श्री. दगडू पाडावे, मुख्याध्यापक श्री. शिवराम आडे सर, म्हसळा टाईम्स प्रतीनीधी महादेव म्हात्रे, नवोदित चित्रकार आदेश जनार्धन पयेर, कौचाली, गोराडे सर, दिपक पाटिल सर ,जाधव सर,निगडी शाळा मुख्याध्यापक श्री. रांगळे सर, पाभरे शाळेचे श्री. सोलकर सर, श्री. रहाटे सर, श्री. परदेशी सर, श्री. बाजड सर, सौ. शिर्के मॅडम, श्री. बेटकर सर, मुळे सर ,श्री तरंगे सर., बिचुकले सरसाठे सर, गव्हाणे सर, शिर्के मँडम व ईतर पाभरे केंद्रातील शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
चित्रकार श्री. पाटील सर यांनी आनंददायी पद्धतीने कार्यशाळेची सुरुवात केली. चित्र काढताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम चित्राचे निरिक्षण करणे, आपली एकाग्रता स्थिर ठेवणे, चित्राचे रेखांकन करणे, याबाबतचे प्रभावी मार्गदर्शन त्यांनी केले. मानवी शरीराचे संपुर्ण रेखाटन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. तसेच स्मरणचित्र काढताना विद्यार्थ्यांनी चित्राबाबतच्या कोणत्या बाबी डोळ्यांसमोर आणाव्यात, याचीही माहिती दिली.
या कार्यशाळेमध्ये एकुण १५० मुलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्री. रहाटे सर यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. आडे सर यांनी केले. अशाप्रकारे निसर्गाच्या सानिध्यात व उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला.

Post a Comment