संजय खांबेटे म्हसळा
जगभरात डिजीटल क्रांती झाल्याने शिक्षणाचा संदर्भ आणि महत्त्व बदलुन गेले आहेत.डिजीटल तंत्रज्ञान विकसित झाल्या पासुन शिक्षणाचे अध्यापनात,अध्ययनात व मूल्यमापनच्या प्रकिया सुलभ होत आहेत. म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची घुम शाळा डिजीटल व्हावी आणि येथील ग्रामीण भागातील विध्यार्थी वर्गाला संगणकीय शिक्षण घेता यावे यासाठी घुम गावातील स्थानिक व मुंबईकर चाकरमानी मंडळाने तसेच स्वदेश फाउंडेशन यांचे आर्थिक मदतीने घुम प्राथमिक शाळा डिजीटल शाळा करण्यात आली.शिवरात्री उत्सवाच्या शुभमुहूर्तावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रुती गायकर यांच्या हस्ते डिजीटल शाळेचा उदघाटन करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाला माजी उपसभापती मधुकर गायकर, तालुका अध्यक्ष समीर बनकर,समाजसेवक सुहास महागावकर, मुंबई मंडळ सचिव जगदीश लटके, माजी पोलीस पाटील धोंडू घोले,केंद्र प्रमुख सुनिल पवार,मुख्याध्यापक समीर पाष्टे,सहदेव चव्हाण गुरुजी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,घुम गावचे मुंबई व स्थानिक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.प्राथमिक शाळा डिजीटल करण्यासाठी ग्रामस्थांनी निधीचे संकलन करून संगणक,ब्ल्यूटुथ स्पीकर तर स्वदेश फाउंडेशनने स्मार्ट टीव्ही मिळवून दिला असल्याचे मुख्याध्यापक समीर पाष्टे यांनी माहिती देताना सांगितले.शासनाच्या मदतीची वाट न पाहता घुम ग्रामस्थांनी मुलांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल व्हावे या उद्देशाने प्राथमिक शाळा डिजीटल करण्यासाठी केलेली आर्थिक मदत कौतुकास्पद असल्याचे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी धन्यवाद देताना व्यक्त केले.

Post a Comment