प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
वडवली येथील महाशिवरात्री उत्सव मा. श्री.कॄष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा यांची प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाला.
यावेळी मा. श्री.कॄष्णा कोबनाक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी श्री.कॄष्णा कोबनाक म्हणाले की दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यांना गेल्या वर्षी व या वर्षी देवाची पूजा करण्याचे मान मिळाल्याने ग्रामस्थांचे आभार मानले.वडवली गांव हा गांव राहिला नसून शहर बनले आहे व भविष्यात याला शहरासारख विकसित करायच आहे. वडवली गांव हा मोठ्या लोकसंख्येचा गांव असून येथे मोठ्या कामगार आहेत म्हणून लवकरच येथे कामगार मेळावा घेऊन या सर्व कामगाराना शासनाच्या विविध योजनेतून लाभ मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्री.प्रशांत शिंदे तालुका अध्यक्ष, श्री.आशुतोष पाटील तालुका सरचिटणीस, श्री.शैलेश खापनकर शहर अध्यक्ष श्रीवर्धन, श्री.जयदीप तांबूटकर तालुका अध्यक्ष युवा श्रीवर्धन, श्री.तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस म्हसळा, सौ.मिना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला म्हसळा, श्री.भालचंद्र करड़े तालुका उपाध्यक्ष म्हसळा, श्री.अनिल टिंगरे तालुका चिटणीस म्हसळा, श्री.प्रकाश कोठावले जिल्हा सह संयोजक सोशल मिडिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गांव अध्यक्ष, श्री.शाम धुमाल बुथ अध्यक्ष, श्री.सुरेंद्र बिराड़ी तालुका उपाध्यक्ष युवा, श्री.पवन कांबळे जिल्हा परिषद गट अध्यक्ष युवा यांनी मेहनत घेतली.


Post a Comment