नावीन्यतेचा स्वीकार करून जीवन समृध्द बनवा ...किरणकुमार मोरे मुख्यधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद


एस एन डी टी महाविद्यालयात गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ संपन्न

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

आजच्या पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत स्त्री शक्ती ने आपले सामाजिक उत्तरदायित्व जोपासत समाज विकासात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. आजच्या स्त्रीने नाविन्यतेचा स्वीकार करून जीवन समृध्द बनवले आहे. वैचारिक प्रगल्भते मुळे स्त्री शक्तीचा जागर सर्वत्र घडत आहे ही अभिमानाची बाब आहे असे किरणकुमार मोरे यांनी सांगितले.
एस एन डी टी महाविद्यालयात आयोजित गुणवंत विदयार्थी सत्कार।  व तृतीय वर्ष वाणिज्य व संगणकीय पदवी अभ्यासक्रमाच्या निरोप समारंभ  प्रसंगी किरणकुमार   मोरे यांनी विद्यर्थिनींशी संवाद साधला .
आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देत विविध बाबीवर त्यानी मार्मिक भाष्य केले .एस एन डी टी महाविद्यालया साठी महर्षी कर्वे यांनी प्रचंड संघर्ष व त्याग केला त्यांची फलश्रुती आज निदर्शनांस येते आहे .एक काळ स्त्री ही दुर्लक्षित होती .आधुनिक शिक्षण व स्वातंत्र्य प्राप्ती नंतर स्त्री ने सर्व क्षेत्रात यशाचे शिखर सहज सर केले .आई ,बहीण ,पत्नी, मुलगी या सर्व नात्यात गोडवा व जिव्हाळ्या स्त्रीने सदैव जोपासला त्यामुळे  जीवनरुपी संसार सुखाचा झाला .मोरे यांनी उपस्थित विद्यर्थिनींना आपल्या ध्येया कडे वाटचाल करण्यासाठी ध्येयवादी मानसिकता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच आपणास जे काम सहज जमते व ते करतांना आपल्याला आनंद मिळतो असे क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिला .कायद्याने आज स्त्री सक्षमतेसाठी विविध कायदे व  कलमाची निर्मिती करून अंमलबजावणी केली आहे .आपली मानसिकता आपले यश ठरवत असते .सकारात्मक विचार अपयशाचे यशात रूपांतर करू शकते .त्याकरणे आपली मानसिकता ही सदैव सकारात्मक बनवा. प्रत्येक व्यक्ती मध्ये विशेष असा एक तरी गुण असतो तो गुण ओळ्खने महत्वाचे आहे. या महत्वाच्या गुणाला खरी गुणवत्ता असे संबोधले जाते असे किरणकुमार मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले .सदरच्या कार्यक्रमात रवींद्र नारायण राऊत विद्यलयाचे मुख्याध्यापक श्रीयुक्त घोळवे यांनी विद्यर्थिनींना भावी आयुष्यात यश प्राप्तीसाठी कठोर मेहनत ,चिकाटी ,नीतिमत्ता व विनयशीलता या गुणांचे महत्त्व सांगितले .सदरच्या कार्यक्रमात तेजस्विनी दवटे ,ऐश्वर्या भगत या विद्यर्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी कॉलेज चे समनव्यक प्राध्यापक अनिल वाणी , तृप्ती विचारे ,करिश्मा चॊगले ,अक्षता तोडणकर ,संदीप आव्हाड, केदार जोशी ,आय टी आय चे प्राचार्य बावस्कर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचिती काप या विद्यर्थिनींने केले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा