एकदा खासदार पदी निवडुन आणुन मला व्यापक स्वरूपात सेवा करण्याची संधी द्या,जनतेच्या मनातील विकास करू - सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका कुणबी समाज बांधवांना घातली प्रेमाची साद.
संजय खांबेटे : म्हसळा
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्वधर्म समभाव जोपासत 18 पगड जातीधर्माच्या लोकांना आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेवुन राज्य कारभार केला त्याच प्रमाणे तुम्हाला आणि मला राजकारण करताना सर्वधर्म समभाव जोपासत पुढच्या काळात वाटचाल सुरू ठेवत असताना सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी मला येत्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्याचा खासदार निवडुन आणुन व्यापक स्वरूपात सेवा करण्याची संधी द्या अशी प्रेमाची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथे आयोजीत कुणबी समाज मेळाव्याला संबोधीत करताना व्यक्त केले. श्रीवर्धन मतदारसंघात पाऊल टाकले तेव्हा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठेही सत्ता नसताना केवळ विकास करण्याचा ध्यास घेऊन रणांगणात उतरलो आणि येथील जनतेने विश्वासाने मला काम करण्याची संधी दिली 2009 मध्ये माझ्या हक्काच्या रोहा माणगाव विधानसभा मतदार संघाचे अलिबाग,पेण,महाड आणि श्रीवर्धन असे चार तुकडे झाले होते.जातीपातीच्या राजकारण केले जात असताना मी श्रीवर्धन जिंकला.2014 च्या लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने मला अपयश आले त्या दिवशी निराशा होती परंतु न खचता,गप्प न बसता लागलीच जनतेच्या सेवेसाठी बाहेर पडलो तो थांबलो नाही म्हणूनच मला मतदारसंघातील जनतेला अभिप्रेत शेकडो कोटींच्या खर्चाची विकास कामे करता आली.म्हसळा तालुक्यात कोणत्या गाववाडीवस्तीवर काम केले नाही हे सापडत नाही ज्यांना काम करता आले नाही (खासदार अनंत गीते यांचे नाव न घेता) ते आता रायगड लोकसभेत सुनिल तटकरे समोर उभे आहेत या भीतीने विकास करू असे सांगत बाहेर पडले आहेत. खासदार अनंत गीते यांना केंद्रात साडेचार वर्षे पूर्ण झाल्या नंतर ठोस काम करता आले नाही आता निवडणुका तोंडावर आल्यावर विकास करू सांगत आहेत अशी जाहीर टीका सुनिल तटकरे यांनी कुणबी समाज मेळाव्यात केली.
म्हसळा तालुका कुणबी समाजाचे दिवंगत नेते एस.डी.शिंदे सामाजिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित तालुका लोकप्रतिनिधींंचा सत्कार सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी व्यासपीठावर कुणबी समाजाचे जेष्ठ नेते अंकुश खडस,सरपंच श्रीपत धोकटे,कुणबी समाज पतपेढी संचालक लक्ष्मण भाये,कुणबी संघाचे नेते सुर्यकांत गजमल,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,जिल्हा परिषदेचे सदस्य बबन मनवे,जिल्हा परिषदेच्या सदस्या धनश्री पाटील,माजी सभापती उज्वला सावंत,प.स. सदस्य मधुकर गायकर,नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,कविता बोरकर,रा.काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष महेश शिर्के,जयंत चिबडे,समाजसेवक लक्ष्मण कांबळे,सरपंच रेश्मा काणसे,गणअध्यक्ष सतीश शिगवण,नगरसेविका शितल मांडवकर,सेजल खताते,सरपंच आदि मान्यवर कुणबी समाज ज्ञाती बंधुभगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी सुनिल तटकरे यांनी संबोधीत करताना निवडणूक आचार संहिता संपताच म्हसळा तालुका कुणबी समाजासाठी मागणी केल्या नुसार प्रशस्थ जागेत दिपस्तंभाप्रमाणे भव्य "समाजभवन"उभारून त्यामध्ये गोरगरिबांचे मुलांना उच्च शिक्षण घेता येईल आणि कष्टकरी महिलांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्था केली जाईल असे आश्वाशीत केले.दिप स्वतःजळताना मात्र दुसऱ्या साठी उजाळा देत असतो तशा प्रकारचा आपला काम आहे मी जे बोलतो ते करतो आणि जे बोललो आहे ते केले आहे याची अनेक लोकपयोगी विकास कामांची नामोल्लेख करून सांगितले.तालुक्यातील युवकांचे स्थलांतर थांबण्यासाठी स्थानिक ठिकाणी नोकरी,रोजगार मिळण्यासाठी आगामी काळात माझे प्रयत्न असतील येथे प्रदूषण विरहित औद्योगिक कंपन्या आणुन बेरोजगार तरुण पिढीच्या हाताला काम मिळेल आणि घराघरात आर्थिक सुबत्ता येईल तेव्हाच आपण यशस्वीपणे काम केल्याचे समाधान मिळेल असेही तटकरे यांनी नमुद केले.राजकीय वाटचालीत मला खडतर काळात यश मिळण्यासाठी तालुक्यात बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजाने आणि त्यांच्या नेते मंडळीने आपणास सातत्यपूर्ण सहकार्य केले असल्याचे पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अंकुश खडस तसेच वडिल दत्तात्रय तटकरे यांचे परममित्र माजी सभापती दिवंगत नेते एस.डी.शिंदे यांना काका संबोधून ऋण व्यक्त केले.मेळाव्यात सुनिल तटकरे यांचे हस्ते तालुका लोकप्रतिनिधी आणि कुणबी समाज मान्यवरांना शाल,पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देवुन सत्कारीत केले. समाज नेते अंकुश खडस यांनी प्रास्ताविकात म्हसळा तालुका कुणबी समाजाला भव्यदिव्य समाजभवन इमारतीच्या उभारणीची हक्काने मागणी केली.विकास कस,करावा,विकास कसा असावा फक्त आणि फक्त सुनिल तटकरे करू शकतात म्हणूनच त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार निवडुन दिल्लीला पाठवा असे आवाहन केले.

Post a Comment