प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
स्वदेश फाउंडेशन व लाईफ लॅब पुणे द्वारा आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज 7 मार्च 2019 ला तळा तालुक्यातील पिटसई या शाळेत आयोजित केले होते. या प्रदर्शनात जिल्हाभरातून 80 पेक्षा जास्त विज्ञान मॉडेल सहभागी झाले होते. या स्पर्धेत रेवली शाळेतील पवन पदरत व ओमकार गाणेकर यांची 'कृत्रिम चंद्र' तर पायल नागेश माळी व सिमरन तुकाराम कांबळे यांची 'चुंबकाची जादू' आशा दोन प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. यापैकी पायल व सिमरन यांच्या मॉडेलला रायगड जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख 1000 रु) मिळाले आहे.
त्यामुळे या विद्यार्थी व शिक्षक वृदांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे...

Post a Comment