रायगड जिल्ह्यामध्ये एकही रासायनिक प्रकल्प नको : सुनील तटकरे.



शिवसेनेने आपले मत स्पष्ट करणे आवश्यक

संजय खांबेटे : म्हसळा

      नाणार’ प्रकल्प आता रोह्यात रोहा, अलिबाग आणि मुरूड तालुक्यांतील किनारपट्टीवर तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ही वसाहत सिडकोच्या माध्यमातून उभारली जाणार असल्याची वृत्त येत असतानाचा रायगडचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे  लोकसभेचे  उमेदवार सुनील तटकरे यानी रायगड जिल्हयामध्ये एकही रासायनीक प्रकल्प नको या मुद्दावर आपण ठाम आहोत असे नुकत्याच  आलिबाग येथील पत्रकार परीषदेंत स्पष्ट केल्याने शिवसेनेलाही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. रायगड मध्ये नाणारचे भूत शिवसेनेला अडचणीचे ठरू शकेल.
    सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु शिवसेनेने नाणारला विरोध केला. तसेच भाजपबरोबर युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट घातली. तथापि ही अट मान्य करण्याची वेळ येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गुप्तपणे पर्यायी व्यवस्था उभी करून हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही अशी व्यवस्था केली. या नव्या जागेसंदर्भात अराम्को कंपनी आणि तिच्या भारतीय भागीदारांची मान्यता घेण्यात आली असून त्यानंतरच ही जमीन अधिग्रहित केली गेली, अशी माहिती सरकारातील उच्चपदस्थांनी वृत्तपत्राना दिली. या विषयाची राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता सर्व संबंधितांनी अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेने आगपाखड केली. परंतु त्याचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने जमीन अधिग्रहणासाठी मुख्यमंत्र्यांना आवश्यक ते सहकार्य दिले  या वृत्ताला धरूनच तटकरे यानी रायगड जिल्ह्यामध्ये एकही रासायनिक प्रकल्प नको असे  स्पष्ट केल्याने  शिवसेनेची राजकीय कोंडी झाली आहे. या प्रकल्पासाठीच्या एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी रोहा तालुक्यातील २१, अलिबाग (८), मुरूड (१०) आणि श्रीवर्धन तालुक्यातील एका गावाची निवड करण्यात आली आसल्याचे  वृत्त आहे.
     लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खोटा प्रचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प रद्द करून तो रायगडकरांच्या माथी मारला जात आहे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे चित्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणून बुजून निर्माण केले जात आहे. माझी उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसताना विरोधकांनी मला किती गंभीरपणे घेतले आहे. हेच यावरून स्पष्ट होते, असेही तटकरे यांनी सांगितले.
     भाजपाने जुमलेबाजी करून मतदारांची दिशाभूल केली आहे.  येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्याची किंमत चुकती करावी लागणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गेल्या साडेचार वर्षांत ठोस विकासात्मक एकही काम केलेले नसल्याने त्यांचे कर्तृत्व शून्य आहे, त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत त्यांना नमो मोदीचा जप करावाच लागेल, मात्र यावेळी गीतेंचा पराभव निश्चीत आहे.
    लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने घोषणांचा पाऊस पाडला आणि सत्तेवर आल्यावर  ती तर जुमलेबाजी होती अशी स्पष्ट कबुली दिली त्यानुसार भाजपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडत असल्याचे तटकरे यानी स्पष्ट केले.आघाडी सरकाच्या १५ वर्षांच्या कालावधीत असंख्य विकासकामे झाली आहेत. जुन्या योजनांना नवीन नावे देऊन त्या योजना अमलात आणण्याचेच काम आताच्या युती सरकारने केले आहे. भारतीय संविधानानेच प्रत्येक आमदारांना विकासकामे करण्यासाठी विशिष्ट निधी देऊ केला आहे. सरकारमध्ये असणारेच त्याचे वाटप करतात; परंतु सत्ताधारी आणि विरोधी आमदार यांच्यामध्ये सर्वाधिक निधी कोणी आणला याला महत्त्व आहे. राजशिष्टाचाराने केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री हे पद तुलनात्मक एकाच दर्जाचे आहे. त्यामुळे खासदार गीते यांनी विकासकामांसाठी किती निधी आणला हे सांगणे गरजेचे आहे.


       निवडणुकीच्या तोंडावरच कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन विकासकामे का केली जात आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून गेल्या साडेचार वर्षांत रुग्णवाहिका जनतेला अर्पण करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत, याचेही उत्तर गीते यांना द्यावे लागणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकमेकांवर केवळ टीका आणि टिप्पणी करण्यातच शिवसेना आणि भाजपाची साडेचार वर्षे फुकट गेल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा