टीम म्हसळा लाईव्ह
रायगड लोकसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी, काॅंग्रेस पार्टी व पीपल्स् रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट ) आघाडीचे उमेदवार श्री. “ सुनिल दत्तत्रेय तटकरे “ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील, आ. भास्कर जाधव, माजी आ. मधुकर ठाकूर, माजी आ. माणिक जगताप उपस्थित होते. तत्पुरवी आयोजीत जाहीर सभेला आघाडीचे सर्व दिग्गज नेते, पदाधिकारी व हजारोंचा संखेने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उमेदवार सुनिलजी तटकरे यांचा सोबत, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील, आमदार पंडीतशेठ पाटील, आमदार धैर्यशील पाटील, आमदार बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आ. भास्कर जाधव, आ. संजय कदम,आ. सुरेश लाड, आ. अनिकेत तटकरे, काॅंग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप, माजी.आ.माणिक जगताप, मा अध्यक्ष अदिती तटकरे, राजिप उपाध्यक्ष आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, काॅंग्रेसचे जेष्ठनेते बाळाजीशेठ म्हात्रे, गुलाम पेशमाम, वसंत ओसवाल, दत्ताजी मसुरकर, असे या मतदार संघातील शेकाप- राष्ट्रवादी-काॅंग्रेस पक्षाचे अनेक नेते, जेष्ठ मान्यवर, व हितचिंतक उपस्थित होते.

Post a Comment