रा.जि.प. प्राथमिक शाळा भापट येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न



विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कलेतून सांस्कृतिक वारसा जपावा - नवाज नजिर 

म्हसळा : प्रतिनिधी
                 रायगड जिल्हा परिषद शाळा भापट या शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन समाजसेवक नवाज नजिर, शिक्षणप्रेमी किशोर येलवे, कासिमशेठ मेमन, शिक्षण प्रेमी निलेश गोणबरे , ठाकरोळी विभाग अध्यक्ष रमेश शिंदे,उपाध्यक्ष संतोष घडशी,पं.स. साधन व्यक्ती दिपक पाटील सर, सरपंच राजाराम  तिलटकर, उपसरपंच बळीराम लाड, ग्रां.पं. सदस्य रविंद्र कुवारे, गजानन पाष्टे, वंदना मोहिते, कोळवट शाळेचे पवार सर, लोंढे सर, गाव अध्यक्ष प्रविण ठोंबरे, उपाध्यक्ष कमळेश बेटकर, मुंबई अध्यक्ष रघुनाथ कांदेकर, बौद्धजन मंडळ अध्यक्ष लक्ष्मण मोहिते,  सचिव रामचंद्र कुवारे, खजिनदार मोहन भोसले, उपखजिनदार पांडुरंग जाडे, प्रमोद बेटकर, विनोद जोशी, संपर्क प्रमुख महेश घडशी, सहखजिनदार राजु अलिम, सहसंपर्क प्रमुख गणेश जोशी, सह हिशोब तपासणीस अमोल अलिम, नरेश बेटकर, क्रिकेट कर्णधार गणेश मुकनाक, उपकर्णधार अमित कांदेकर, ज्येष्ठ सल्लागार शंकर बेटकर, नथुराम घडशी, हरिश्चंद्र मोहिते, यशरब नजिर, सोनु बेटकर, सोनु जोशी, शाळा समिती अध्यक्षा भाविका जोशी, महिला मंडळ अध्यक्षा राजश्री  बेटकर, उपाध्यक्षा रुचिता कांदेकर, रंजिता कुवारे, शोभा मोहिते, अंगणवाडी सेविका अनुजा अलिम, श्वेता भो़सले, प्राध्यापिका सलमा मॅडम, मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते.

               या कार्यक्रमात भापट शाळेतील विद्यार्थ्यांचा म्हसळा तालुकास्तरीय स्पर्धेत विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
                  सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य, बालगीत, शेतकरी नृत्य, नाटिका, भारुड, बतावणी, चुटके, मनोरंजनात्मक विनोद इ. सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.या कार्यक्रमात सहभागी कलाकारांना ॐ शिव सत्य क्रिकेट संघ भापट यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
                 नवाज नजिर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांनी या कलेच्या माध्यमातून आपल्या गावाची, समाजाची व परिसराची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकलाकारांनी अप्रतिम देखावा, अंधश्रद्धा जनजागृति नाटिका व आकर्षक गृपडान्स सादर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

                या कार्यक्रमाला विशेष भेट म्हणुन कलावंत श्री. शशिकांत भिंगारदेवे सर यांनी उपस्थित राहून आपली कला व विचार सादर केले.  
                ठाकरोळी विभागाची डान्सर कुमारी दिप्ती करावडे हिने आपल्या अप्रतिम नृत्याची चुणुक दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली.
               या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिक्षक जयसिंग बेटकर, सुत्रसंचालन रामचंद्र कुवारे आणि अंकरींग समीर बेटकर यांनी केले. व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांनी केले.

              या कार्यक्रमासाठी भापट गावचे ग्रामस्थ, महिला मंडळ इ. जातीने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा