प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
रविवार दिनांक 24 फेब्रूवारी 2019 रोजी मौजे बोर्ली पंचतन ता. श्रीवर्धन येथील चिंचबादेवी मंदिराचे प्रवेशद्वाराच अनावरण मा. श्री.कॄष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मिना गाणेकर, सरपंच श्री.गणेश पाटील, श्री.सुकुमार तोड़लेकर, अखंड आगरी समाज तालुका अध्यक्ष श्री.रमेश कांबळे,श्री मंदार तोडणकर, श्रीनिवास गाणेकर, आगरी विकास मंडळ मुंबई अध्यक्ष श्री.सुधाकर कांबळे, श्रीकांत धनावड़े, दत्तात्रेय धनावडे, आदेश धुमाळ,दत्तात्रय जनावरे, सुर्यकांत धनावडे, श्री.शाम भोकरे, इत्यादी मान्यवर मंडळी व महीला मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री कृष्णा कोबनाक यानें देव देवतांचे जीवनातील महत्त्वाचे स्थान बाबत सांगितले, आपण सर्व निमित्त आहोत आपल्या हातून सर्व कार्य देव घडवतो,देवीचे पावित्र्य जपावे या करीता हा प्रवेश द्वार, संसारातील दुख विसरून देवीची मनोभावे पुजा अर्चना केल्यास समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळतो. मुंबई मध्ये वास्तव्य करीत असलेली मंडळी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी गावाला येतात त्यांच्या संकल्पनेतून हा प्रवेश द्वार उभारण्यात आला तया मंडळाचे कौतुक करण्यात आले.

Post a Comment