ग्रामपंचायत निवडणुक निकाल


मतदारानी शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के व शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील याना चारली धूळ.

तालुका प्रमुखानी पदत्याग करावा : जेष्ठ शिवसैनिक

शेका पक्षाचा खांदे पालट व्हावा 

संजय खांबेटे: म्हसळा

   तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल  जाहिर झाला.रोहीणी व  खामगाव ग्रामपंचायती वर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली सत्ता कायम राखली.गोंडघरला लहू तुरे यांचे स्थानिक विकास आघाडीने शेका पक्षाला धुळ चारीत  यश संपादन केले .खारगांव (बु.) येथे अनंत नाक्ती यांचे पॅनल आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरले.  खामगाव, गोंडघर, खारगांव ( बु)  ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) व रोहीणी ( सर्वसाधारण स्त्री) असे सरपंच आरक्षण आहे. 
      गोंडघरला लहू तुरे याना ३९३ मते मिळाली, राष्टवादी कॉंग्रेस - शेकाप आघाडीचे संदीप दामोदर पाटील याना ३६३ मते मिळाली , अनंत चापेटकर याना ८३ मते मिळाली.एकाच वेळी शे. का. प. व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आम्ही पराभव केल्याचा दावा स्थानीकानी केला. ग्रामपंचायत तुरे-साठविल कर यांचे ग्रामविकास आघाडीकडे असल्याचा दावा संबधीतां चा  आहे
  खारगाव   (बु.) मध्ये सरपंच अनंत नाक्ती हे केवळ १५ मतानी निवडून आले. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिपक म्हात्रे याना ३५१ , काँग्रेस ( आय)च्या निलम वेटकोळी याना १७७ मते मिळाली.
    खामगाव ग्रामपंचायत ही शिवसेना ता. प्रमुख नंदू शिर्के यांचे गाव तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरपंचपदाच्या उमेदवार प्रियंका प्रसन्न निंबरे यानी शिवसेनेचे उमेदवार सागर नथुराम गोरीवले यांचा तब्बल २८४ मतानी पराभव करून खामगाव पंचक्रोशीत शिवसेनेचे अस्तीत्व संपले असे जाहीर केले.

          "म्हसळा शिवसेना तालुका प्रमुख खामगाव गड राखण्यास अपयशी .शेकापचे तालुका चिटणीस गोंडघर गड राखण्यास अपयशी तर शिवसेनेचे जेष्ट नेते अनंत नाक्ती यांना खारगाव बुद्रुक वर भगवा फडकविण्याच  कॉंग्रेसची झाली मदत या  राजकीय स्थित्यंतरा मुळे शिवसेना तालुका प्रमुखानी पदाचा त्याग करावा, शेकापक्षाने  तालुक्यातीत आपले अस्तीत्व कमी होत असताना नेतृत्वात बदल करावा अशी राजकीय जाणकारांची चर्चा आहे.जेष्ठ शिवसैनिक अशा पद्धतीची मागणी करणार आहेत "

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा