ग्रामपंचायत रोहिणी राष्ट्रवादीकडे बिनविरोध : खारगांव (बु.) मध्ये होणार अटी- तटीची लढत
संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा तालुक्यातील गोंडघर, खारगाव ( बु) खामगाव व रोहीणी याचार ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम आहे, आज मतदान झाले.तालुक्यात ७७.३४ % मतदान झाले
आज झालेल्या मतदानात खारगाव ( बु ) मध्ये ८०. ७५ % मतदान झाले आहे. थेट सरपंच पदासाठी तीरंगी लढत आहे. त्यामध्ये काँग्रेस (आय)च्या निलम वेटकोळी,शिवसेना अनंत नाक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस दिपक म्हात्रे अशी लढत आहे. गोंडघर ग्रामपंचायतीसाठी आज ७२.५४ % मतदान झाले. थेट सरपंच पदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये लहु तुरे व संदीप पाटील योच्यात लढत आहे. खामगाव येथे ७८.२३ % मतदान झाले .सरपंच पदासाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी अशी लढत होईल. शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के यांची ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथे विशेष रंगत येणार आहे.
रोहीणी ग्रामपंचायती साठी थेट सरपंच १ पद व तीन प्रभागातून अन्य ७ सदस्यांचे साठी तेवढच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बीन वीरोध ( राष्ट्रवादी कॉंग्रेस) ची आली आहे. तेथे सुनिता काशीनाथ नाक्ती ( राष्ट्रवादी कॉंग्रेस) व १) रंजना नाक्ती २ ) गोऱ्या डांगे ३) गोपाळ ताम्हनकर . ४ ) शिल्पा पाटील ५) सुगंधा डांगे ६) प्रमोद फुटाक ७ ) जनी पाटील या अन्य ७ जणांचे पॅनल बिनविरोध आले.
" तालुक्यात शिवसेना व काँग्रेस आय अशी युती आहे. खामगाव व गोंडघर येथील कॉंग्रेसचे निष्ठावंत मतदार नक्की कुठे मतदान करणार यावर निर्णय आहे. तर खारगाव ( बु ) मधील शिवसैनीक कॉंग्रेसच्या निलम वेटकोळी याना मतदान करणार का ? यावर सरपंच उमेदवाराची भीस्त आहे"

Post a Comment