देवघरात स्वयंभु श्री अमृतेश्वर येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन.



"दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर, म्हसळ्यातील महेश्वर,घुमचे घुमेश्वर आणि देघरचे अमृतेश्वर मंदिरात आहे वैशिष्ट्यपुर्ण साधर्म्य."

म्हसळा -प्रतिनिधी 
म्हसळा - माणगाव हमरस्त्यालगत देवघर येथील पेशवेकालीन स्वयंभु श्री अमृतेश्वर देवस्थान भाविकभक्तांना नवसाला पावतो असे सर्वश्रुत आहे.अमृतेश्वर मंदिर कोणी आणि केव्हा बांधलेले हे आता सांगणे कठीण असले तरी त्याची इतिहास कालीन रचना पहाता ते पेशवेकालीन असावे असा नागरिकांचा कयास आहे.
सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर,म्हसळयातील महेश्वर,घुमचे घुमेश्वर आणि देवघरचे अमृतेश्वर  मंदिरात बहुतांश साधर्म्य आहे.वरील चारही मंदिर आग्नेय कडुन सरळ रेषेत नेऋत्यच्या दिशेत वसलेली आहेत.या मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी सर्वच मंदिरांचे समोरून दक्षिण-उत्तर दिशेला मोठया नद्यांचा प्रवाह बारमाही वाहत आसतो.हरिहरेश्वर शिव मंदिरासह म्हसळा तालुक्यातीलबसर्वच शिवमंदिरे गावा बाहेर नदीच्या तीरावर स्थापित आहेत हे ह्या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे.दक्षिणकाशी म्हणुन ख्याती असलेल्या ह्या मंदिरात वर्षभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.कार्तिकी एकादशी,श्रावणमास आणि महाशिवरात्री येथील शिवमंदिरात मोठी यात्रा भरते.सन 1965/66 मध्ये देवघर आणि देवघरकोंड येथील ट्रस्टी महादेव चंद्रकांत महामुणकर,गुणाजी बांंद्रे,रामा भुवड,कृष्णा पाणदसे,आत्माराम महामुणकर आदींच्या पुढाकाराने श्री देवदत्त व श्री अमृतेश्वर देवालय विश्वस्त मंडळाची नोंदणी केली तेव्हा पासुन देवघरातील शिवमंदिरात मोठया उत्स्फूर्तपणे सर्वच उत्सव साजरे करतात. अल्पावधीतच येथील स्वयंभु देवस्थानची कीर्ती पसरून हे देवस्थान भाविकांच्या नवसाला पावतो म्हणूनच येथे भक्तांची वर्दळ वाढली आणि पर्यटणीय महत्त्व वाढत आहे.देवघरातील तत्कालीन विश्वस्तानी मंदिराचा पाया रचुन त्यावर कळस चढविण्याची जबादारी आताचे विश्वस्त सांभाळत आहेत त्यात प्रामुख्याने समाजसेवक माजी पंचायत समितीचे सदस्य तुकाराम गिजे,माजी सरपंच श्रीधर महामुणकर,शांताराम चौकीकर,गणपत मुंडे,गावअध्यक्ष शिवराम शिंदे,मुरलीधर महामुणकर,सुरेंद्र शिर्के,विनायक गीजे,अनिल,सचिन महामुणर आदि ग्रामस्थ व युवा मंडळी कार्यतत्पर राहुन नव्याने मंदिर व परिसर सुशोभीत,आकर्षित करून तीर्थक्षेत्राचे नावलौकिकात भर घातली आहे.सालाबादप्रमाणे साजरा होणाऱ्या आजच्या महाशिवरात्री उत्सवाचे औचित्याने देवघरातील अमृतेश्वर मंदिरात सकाळी 6 वाजता अभिषेक,9 वाजता महाआरती,10 वाजता दिंडी, दुपारी 12 वाजता दिलीप शिंदे बुवा यांचे सुस्वर भजन आदी पूजाविधीचे व यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा