किल्ले रायगड ते श्रीवर्धन शिवज्योतीला 35 वर्षाची परंपरा ; तरुणांचा उदंड प्रतिसाद


श्रीवर्धन : संतोष सापते
श्रीवर्धन तालुक्यातील  शिव जयंती उत्सव समितीच्या  तरुणांनी  किल्ले रायगड ते श्रीवर्धन 90 किलोमीटर पायी चालत  शिवज्योत आणली .शिवजयंती उत्सव समिती च्या 35 तरुणांनी दोन दिवसाच्या मोहिमेचे आयोजन केले .श्रीवर्धन शहरातून 22 तारखेला सकाळी 10 वाजता समिती च्या तरुणांनी किल्ले रायगड कडे मार्गक्रमण केले .सायंकाळी सहा वाजता किल्याच्या पायथ्याशी पोहचल्यावर साडेसहा वाजता रायगड किल्ल्यावर प्रस्थान केले. शिरकाई माता  , जगदीश्वर, भवानी माता मंदिरात विधिवत पुजा पुर्ण करून  शिवछत्रपती च्या समाधी जवळ  शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली .संध्याकाळी दहा वाजता किल्ले रायगड वरून शिवज्योत सह तरुणांनी श्रीवर्धन कडे मार्गक्रमण केले .पाचाड, महाड ,गोरेगाव, खामगाव, म्हसळा ,वडघरपांगलोली ते श्रीवर्धन  90 किमी अंतर तरुणांनी पायी दौड करून पुर्ण केले .श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वारा जवळील मराठा भवनाच्या प्रांगणात शिवज्योत मोहिमेत सहभागी तरुणांचे जंगी स्वागत करण्यात आले. मराठा समाजाच्या  सुवासिनीं कडून तरुणांना ओवळण्यात  आले .   श्रीवर्धन शहराच्या शिवाजी चौकात शिव जयंती उत्सव समिती व विविध घरातील सुवासनी कडून सर्व तरुणांनाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्या नंतर मार्केट ,प्रभू आळी, सावरकर चौक ,आंबेडकर चौक ,गणेश आळी ते पेशवे आळी शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली .शिवाजी चौकात शिवज्योत शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ स्थानबद्ध करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. वंदे मातरम गीत गायन झाल्या नंतर शिव जयंती उत्सव समितीच्या सभासदांनी आद्य पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला .
राजेंद्र भोसले, शिवराज चाफेकर,सिद्धेश महाडिक, ओंकार पार्टे, स्वप्नील नेवरेकर, स्वप्नील कदम, कुणाल दवटे, ओमकार भुसाने, अमेय सावंत व सुयोग साळुंखे यांच्या सह 35 तरुणांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला .


शिवज्योत आणण्यासाठी दोन दिवसांच्या मोहिमेचे आयोजन आम्ही केले .शिवछत्रपतीच्या वरती श्रध्दा व त्याच्या कार्याचा सार्थ अभिमान आम्ही बाळगतो .तरुण पिढीनी शिवज्योती तून प्रेरणा घ्यावी व आदर्शवत पिढी निर्माण व्हावी ही अपेक्षा आहे .
-राजेंद्र भोसले (सदस्य शिव जयंती उत्सव समिती )


शिवज्योत आणणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे .मोहिमेचे दोन दिवस जीवनात चैतन्य निर्माण करणारे आहेत .शिवछत्रपतीचा मावळा बनणे निश्चितच प्रेरणादायी आहे .
 -शिवराज चाफेकर (सदस्य शिव जयंती उत्सव समिती )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा