श्रीवर्धन : संतोष सापते
श्रीवर्धनमधील बारा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली असून भाजपने तालुक्यात आपले खाते उघडले आहे .
शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील बारा ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीपैकी बोर्ली ग्रामपंचायत वर शिवसेनेना विजयी झाली आहे .तालुक्यतील काही ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप , तर काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी अशी छुपी युती पहावयास मिळाली मात्र जल्लोषात मात्र याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते. बारा ग्रामपंचायत निवडणुकीत शिस्ते, भोस्ते व निगडी या तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सरपंच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित ग्रामपंचायतीत झालेल्या वडवली ग्रा.प मध्ये प्रियांका रुपेश नाक्ती १९९३(राष्ट्रवादी)आस्था आदेश शिरवटकर ४८४
वेळास ग्रा.प मृदास काशिनाथ तोंडलेकर २१९ सुरेश भिकू धोपट ९७ आशुतोष अंकुश पाटील २२५ (भाजप) विवेक गजानन मिरकर २०२
बोर्ली पंचतन ग्रा प नम्रता श्रीनिवास गानेकर २१८२(शिवसेना)स्नेहल गणेश पाटील १०३७
आराठी ग्रा प काझी नाझ नाझीम ७२९(राष्ट्रवादी) कादरी आलेशा फैयाज ७२ तेजस्विनी प्रसाद घोणे ३०५ पठाण मुशरफ १४६
काळींजे ग्रा प उदय गजानन पाटील ४२९( भाजप) शांताराम सहदेव मळेकर २३८
मारळ ग्रा प मंगेश शंकर चाचले २९६ (भाजप) किरण विष्णू खोपटकर १५२ स्वप्नील शेडगे १२ मंगेश मयेकर १०७
नागलोली ग्रा प विजय नथुराम पडावे ४६७(राष्ट्रवादी) गणपत सोलकर ३७०
दांडा ग्रा प महेंद्र टाकले १८४ तुषार विचारे ३३२(भाजप)
हरेश्वर ग्रा प अमित प्रफुल्ल खोत ३६६(राष्ट्रवादी) सुयोग गजानन लांगी २९२ प्रसाद शांताराम पाडावे १६३ असे मतदान झाले .
ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
दांडा ग्रामपंचायत निवडणूक ईव्हीएम मशीन मध्ये उमेदवारांच्या सिरीयल नंबरमध्ये बदल झाल्यामुळे दोन सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर लगेचच निवडणूक निर्णय अधिकारीनी चुकीची दुरुस्ती करून मतमोजणी करण्यात आली व शिवसेनेच्या दोन उमेदवारांना विजयी म्हणून घोषित करण्यात आलं.


Post a Comment