आडी धारवली रस्त्यावर 120 वर्ष जुने झाड कोसळले ; वाहतुक ठप्प ,शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल



श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील आडी धारवली रस्त्यावर काळ रात्री 1:45च्या सुमारास मध्यरात्री 120 वर्षा पुर्वीचे पायर आंब्याचे झाड पडले त्यामुळे सर्व वाहतुक ठप्प झाली .आडी येथे रात्र वस्तीस असलेल्या एस टी महामंडळाच्या दोन्ही बसेस मधील आडी येथेच अडल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशी यांचे अतोनात हाल झाले. इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा शेवटचा पेपर होता .नियमित तालुक्याच्या ठिकाणी रोजगारासाठी जाणाऱ्या लोकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. श्रीवर्धन मार्गावरील आडी कोलमांडला ,धारवली, साखरी, जावेळे व म्हसळा मार्गावरील कोळे ,तळवडे, आंबेत फाटा, कोझरी ,पानवे ,कल्टे, या सर्व गावातील एस टी वरती अवलंबून असणाऱ्या जनतेस झाड पडल्याचा फटका सहन करावा लागला .मध्यरात्री झाड पडल्याचे समजताच आडी ग्रामस्थांनी झाड हटविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले .परंतु झाड अवाढव्य असल्याने ते हटवणे सहजासहजी शक्य झाले नाही .स्थानिक ग्रामस्थांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या शी  संपर्क साधला असता ते आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगण्यात आले .जिल्हा परिषदेच्या एका ही अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही . आडी मधील ग्रामस्थांनी कुऱ्हाड ,कोयती, करवत  याच्या साहाय्याने सदरचे रस्त्यावर आडवे पडलेले झाड जवळपास चार तास मेहनतीने रस्त्यावरून बाजूस हटवले .त्या नंतर वाहतुक सुरळीत  चालू झाली .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा