संजय खाबेटे : म्हसळा
आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपते, या वर्षी ३१मार्च ला रवीवार आसल्याने १ दिवस आधिच शनीवार दिं.३० मार्च रोजी आर्थिक वर्षाची सांगता होणार आहे. या साठी कामकाज उरकण्यासाठी प्रशासनाची लगीन घाई सुरु आहे. शासनाचे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असते मार्च एंडच्या शेवटच्या दिवशी सर्व कोषागर कार्यालय , बॅंका रात्री उशीरा पर्यंत सुरु असतात . प्रलंबीत देयके व इतर नीधी मंजुर करून घेण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची लगबग असते.बॅंकाही रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. या वर्षी ३१मार्च ला रवीवार आल्याने १ दिवस आधिच शनीवार दिं.३० मार्च रोजी आर्थिक वर्षाची सांगता होणार आहे.
" आर्थिक वर्षाच्या शेवटी देयके खिकारण्याचा संगणक प्रणालीवर ताण येत असतो, शनीवार दिं.३० मार्च रोजी आर्थिक वर्षाची सांगता होणार आसल्याने तत्पूर्वी देयके सादर करावीत अशा सूचना संबधीताना देण्यात आल्या आहेत. जी देयके उशीरा येतील ती पुढील वर्षाचे अनुदानातून काढण्यात येतील"
-फिरोज मुल्ला , कोषागार अधिकारी रायगड

Post a Comment