म्हसळा शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था चेअरमनपदी कृष्णा कोबनाक यांची निवड



संजय खांबेटे : म्हसळा- 

म्हसळा तालुक्यातील सहकार क्षेत्रात  अग्रगण्य असलेली शिवकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमन पदी रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.चेअरमन शैलेश कुमार पटेल यांनी त्यांचे पदाचा कार्यकाळ पुर्ण झाले नंतर राजीनामा दिला होता त्यांचे रिक्त जागी संचालक मंडळातील कृष्णा कोबनाक यांची सर्वानुमते चेअरमन पदी निवड करण्यात आली.संस्था चेअरमन निवडीचे काम निवडणुक निर्णय अधिकारी बी.के.आखाडे यांचे अध्यक्षतेत निःपक्षपाती पार पडले. कृष्णा कोबनाक यांच्या संचालक निवडीचे वेळेला माजी संचालक शैलेश कुमार पटेल,व्हाईस चेअरमन दिलीप कांबळे,संचालक महेंद्र पारेख,मंगेश म्हशीलकर,प्रकाश रायकर,संस्था व्यवस्थापक सुजित पोटले,संचालिका सविता काणसे,बँक कर्मचारी ज्योती करडे,दर्शना पाटील,कॅशिअर बांद्रे,सुजित पोटले,विवेक गीजे उपस्थित होते.सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, क्रीडा आणि औद्योगिक क्षेत्रात आवड आणि कार्यरत असलेले रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ प्रमुख कृष्णा कोबनाक यांची म्हसळ्यातील नामांकित शिवकृपा पतसंस्था चेअरमन पदी निवड झाल्याने त्यांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप कांबळे,संचालक महेंद्र पारेख यांनी पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.चेअरमन पदी निवड झाल्यानंतर कृष्णा कोबनाक यांनी सर्व सहकारी यांना धन्यवाद देताना शिवकृपा पतसंस्थेचा तालुका स्तरावर मोठया प्रमाणात विस्तार करण्यासाठी मी सर्वांचे सहकार्य घेवुन यशस्वी प्रयत्न करीन.तालुक्यातील कष्टकरी,ग्रामीण शेतकरी,गृहउद्योग,छोटे-मोठे व्यावसायिक, महिला बचतगटास शिवकृपा पत संस्थे मार्फत रितसर आर्थिक देवाणघेवाण करून बँकेचा चेअरमन म्हणुन व्यवसाय वाढीकरता पारदर्शक काम करणार असल्याचे कोबनाक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.कोबनाक हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मागील अनेक वर्षे कार्यरत असतानाच या संस्थेच्या संचालकपदी मागील १० वर्षे कार्यरत आहेत नव्याने त्यांची चेअरमन पदी निवड झाल्याने म्हसळा तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा