गोवर-रुबेला लसीकरण : जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ; तालुक्यात केवळ ६o% उदिष्ट साध्य



गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राज्यात ८६ % जिल्ह्यात ८४ % लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करणाऱ्या महाराष्ट्रात :म्हसळा तालुक्यात केवळ ६o% उदिष्ट साध्य.
तालुक्यात जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी

संजय खांबेटे : म्हसळा
  संपूर्ण राज्यात  गोवर-रुबेला लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली राज्यात २ कोटी ६८ लाख बालकाना लसीकरण झाले. उद्दीष्टा प्रमाण  ते ८६ % लसीकरण झाले. रायगड जिल्हयांत ७ लाख ९३ हजार ४५१ उद्दीष्ट होते त्यापैकी ६ लाख ६७ हजार ५६१ बालकाना लसीकरण झाले हे प्रमाण ८४ % आहे. म्हसळा तालुक्यात ११ हजार ८४८ उद्दीष्ट होते. त्यापैकी ७ हजार ५ २ बालकाना लसीकरण करण्यात आले. ते प्रमाण केवळ ६० % आहे.
   पोलीओ मुक्त भारता नंतर गोवर-रुबेला मुक्त भारत २०२० पर्यंत करायचे आहे. रुबेला मुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात . रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. अशा गंभीर आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ९ महीने ते १५ वर्षाखालील सर्व बालकांसाठी गेले काही महीने लसीकरण सुरु होता.तालुक्यातील काही उर्दु माध्यमाच्या  शाळा व्यवस्थापन / पालकानी लसीकरणाला नकार दिला आहे. काही शाळा व पालकांमध्ये गोवर-रुबेला लसीकरणा बाबत समज गैरसमज आसल्याने पालकांचा विरोध होता . लसीकरणा बाबत असेलेले गैर समज दूर करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.


ज्या शाळांतून व्यवस्थापक /पालकां कडून लसीकरणाला नकार  करण्यात आला अशा सर्वाना W. H. O. व सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागा , मुस्लीम समाजाचे स्थानिक प्रतिष्ठीत नेते, मौलाना यांचे समवेत
गोवर रुबेला लसीकरणाचे फायदे आणि गैरसमज संभाव्य धोके या बाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.
-डॉ. सूरज तडवी,प्रभारी ता. आ. अधिकारी म्हसळा


" म्हसळा तालुक्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ही राष्ट्रीय कार्यक्रम समजून तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शासकीय अधिकारी विविध समाजाचे नेते या सर्वानी मिळून राबविणे आवश्यक होते. त्या पद्धतीने नियोजन झाले नसल्याचे समजते.

"राज्य शासन म्हसळ्याचे आरोग्याकडे सतत दुर्लक्ष करीत आहे. ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे कायम स्वरुपी अधीक्षक व डॉक्टर नाही. जिल्हा परीषद आरोग्य विभागाकडे ता .आरोग्य अधिकारी व ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत . तर अन्य कर्मचारी पदे ६० % रिक्त असल्याने आरोग्य विषयक कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही "
-महादेव पाटील, माजी सभापती, पं.स. म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा