श्रीवर्धन : प्रतिनिधी
सतत होणाऱ्या वीज खंडितच्या त्रासातून श्रीवर्धनकरांची आता सुटका होणार आहे श्रीवर्धन तालुक्यासाठी ४ कोटी ८४ लाखांच्या उच्चदाब वाहिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजन यांनी दिली . यामुळे श्रीवर्धनकर नागरिकांना आता सुरळीत वीजपुरवठा करता येणार आहे श्रीवर्धन तालुक्यातील पाभरेपासून श्रीवर्धन सबस्टेन पर्यंतच्या उच्चदाब वीजवाहिनी प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे गेले कित्येक वर्षे पाभरे ते श्रीवर्धन सबस्टेशनपासून जवळ जवळ १७०० वीज ग्राहकांना अंधारामध्ये राहावे लागत होते . एका लाईनमधील बिघाडामुळे विद्युतप्रवाह बंद झाला तर ग्राहकांना अंधारात राहावे लागत होते . मात्र आता बसविण्यात येणार्या उच्चदाब वाहिनीमुळे एका लाईनमध्ये बिघाड झाल्यास लगेच दुसर्या विद्युत लाईनमधून वीजपुरवठा करण्यात येणार आहे . शिवाय आता जी नवीन विद्युतप्रवाह वाहिनी जोडण्यात येणार आहे ती जमिनीखालून जोडली जाईल . ही वीजजोडणी पाभरे सबस्टेशनपासून ते सकलपपर्यंत राहणार आहे त्यामुळे खाडीमध्ये पोल पडणे , रात्रीच्यावेळी विद्युत पुरवठा खंडित होणे , अशाप्रकारच्या अनेक समस्या आता सुटणार आहेत . त्यासाठी आता ४ कोटी ८४ लाखांचे डिपीआर आता नवीन विद्युत वाहिनी जोडण्यासाठी मंजूर झाला आहे . त्याच्या निविदाही जाहीर करण्यात आल्या आहेत . याचा प्रस्ताव श्रीवर्धन उपविभागातर्फ मांडण्यात आला होता . या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या जोडणीसाठी किमान १ वर्षाचा कालावधी लागणार आहे . तर कामाची सुरुवात ३ ते ४ महिन्यात होणार असल्याचेही श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजन यांनी सांगितले .

Post a Comment