नियोजित खानलोशी -गोंडघर MIDC ला ग्रामस्थांचा विरोध ; शासन शेतकऱ्यांचे का उद्योजकांचे ?



संजय खांबेटे : म्हसळा
कोणत्याही विकासाला लागतो विरोधाचा पाया या प्रमाणेच म्हसळा तालुक्यातील पुणे -दिघी या राष्ट्रीय मार्गावरील नियोजित खानलोशी -गोंडघर MIDC ला दोनही गावातील ग्रामस्थांचा विरोध आहे. नव्याने MIDC स्थापन होण्यासाठी बाधीत शेतकरी, ग्रामस्थ यांची प्रत्यक्ष मते जाणून घेणे व दर निश्चिती  करण्यासाठी प्रांतअधिकारी प्रविण पवार यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीला  म्हसळा तहसीलदार रामदास झळके,नियोजित खानलोशी -गोंडघर MIDC च्या संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पाटील , सरपंच स्वप्नील बिराडी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी भांडवलकर , वन,बांधकाम विभागाचे अधिकारी, लहू तुरे,मनोज मेंदाडकर, लक्ष्मण भाये,शब्बीर मुरतुजा व अन्य बाधीत शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
      खानलोशी -गोंडघर  या म्हसळा तालुक्यातील रस्त्यालगतची सपाट व कुडकी धरणा शेजारील ९२.२८० हेक्टर खाजगी क्षेत्रात शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ प्रमाणे  MIDC  क्षेत्र म्हणून अधिसूचना काढून जाहीर केले आहे. खानलोशी मधील १४३ शेतकऱ्यांची ७७.२१७ हेक्टर व गोंडघर येथील २८ शेतकऱ्यांची १५. २८० हेक्टर क्षेत्र या नव्याने प्रस्थावीत प्रकल्पासाठी घेण्यात  येणार आहे .त्याबाबत अधिकृत प्रक्रिया सुरू आहे

शासनाच्या दुटप्पी धोरणाने बाधीत शेतकरी झाले नाराज.

उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यानी खानलोशी -गोंडघर  या गावात MIDC  क्षेत्र म्हणून अधिसूचना काढलीत मग येथे कोणत्या प्रकारची MIDC येणार आहे.( उदा.केमीकल, I.T., इंजीनिअरींग, लघू, शेती विषयक प्रक्रिया उद्योग ) या विषयी योग्य खुलासा न केल्याने शासन शेतकऱ्यांसाठी नसून उद्योजकांसाठी असल्याचे  सूचक वक्तव्य काही शेतकऱ्यानी केले.


" आम्ही दोनही गावचे ग्रामस्थ आमची एकही इंच जमीन MIDC साठी देणार नाही. MIDC मुळे आमच्या परीसरांत असणारा पर्यटन व्यवसाय व अन्य घरघुती व्यवसायांवर विपरीत परीणाम होतील. सुरवातीला चांगली वाटणारी MIDC नंतर रस्ते, वीज, पाणी, अशा अनेक पायाभूत समस्या चा बोजवारा उडवतात लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी हे सुध्दा गावाकडील संस्कृतीला धोकादायक होऊ शकते"
-स्वप्नील बिराडी, सरपंच 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा