बुरशी , तुडतुड्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन
म्हसळा : वार्ताहर
तालुक्यात यावर्षी आंबा , काजू फळांना यावर्षी अनुकूल वातावरण असल्याने बागायतदारांचे सुगीचे दिवस आले आहेत . परंतु , आलेल्या पिकांवरती बुरशी , तुडतुडा रोग आल्याने पिकांवर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे बागायतदारांनी वेळीच योग्य ती काळजी घ्यावी , असे आवाहन तालुका कृषी कार्यालयातून करण्यात आले आहे . तालुक्यात आंबा बागायतदार अंदाजे २४०० हेक्टर काजू बागायात ७०० हेक्टर आहे . बागायतदारांनी प्रशिक्षणासमवेत फवारणीचा अभ्यास करणे गरजेचे असून कोणत्या वेळी पिकांवर कोणती फवारणी करायला हवी याची योग्य माहिती शेतकर्यांनी जाणून घेतल्यास आलेल्या पिकांचे नुकसान होणार नाही , असे कृषी विभागातून सांगण्यात आले . यावर्षी आंबा , काजु पिकाला योग्य वातावरण मिळाल्याने पिक चांगले आले असल्याचे बागायतदारांनी सांगितले . मात्र आलेल्या पिकांवरती बुरशी , तुडतुडा रोग आल्याने पिकांवरती परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे बागायतदारांनी वेळीच योग्य ती काळजी घ्यावी , असे आवाहन तालुका कृषी कार्यालयातून करण्यात आले आहे
यावर्षी पिकाला वातावरण अनुकूल आहे . परंतु , तुडतुडा कीड बुरशी , काजू पिकांवर टीमॉक्सीटो हा देखील रोग मोठ्या प्रमाणात आहे . सरकारने एकात्मिक कीटक नियोजना अंमलात आणावी . त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळेल.
-व्यंकटेश सावंत, प्रगतशील शेतकरी
आम्ही शेतकच्यांना वेळोवेळी फवारणीविषयी मार्गदर्शन , सूचना देत असतो . शेतकत्यांची बागायत कशाप्रकारे नवसंजीवनी घेईल , यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
-सुजय कुसाळकर कृषी पर्यवेक्षक , म्हसळा

Post a Comment