श्रीवर्धन : जीवना बंदर जेट्टीकडे दुर्लक्ष


श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर जेट्टीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे . श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर हे ताजी मासळी खरेदी विक्रीचे मुख्य ठिकाण आहे . या ठिकाणी दररोज राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने ताजी मासळीचा लिलाव पाहण्यासाठी येत असतात . याचप्रमाणे समुद्रामध्ये निळयाक्षार फेसाळणाऱ्या लाटांवर डोलताना नौका पाहण्यासाठी पर्यटक श्रीवर्धन मधील जीवना बंदरावर आवर्जून येत असतात . त्याच प्रमाणे श्रीवर्धन जीवना बंदरावर सुमारे १५० ते २०० नौका हे फक्त जीवना कोळिवाडा मधीळ श्रीकृष्ण मच्छिमार सहकारी संस्थेचे आहे. तसेच श्रीवर्धन मधील मुळगाव मच्छिमार विविधकारी सहकारी संस्था , कोकण मच्छिमार सहकारी संस्था , आदिवासी मच्छिमार सहकारी संस्था , महिला मच्छिमार सहकारी संस्था इत्यादी मच्छिमार सहकारी संस्थेचे सुमारे ७०० ते ८०० लहानमोठे यांत्रिक व बिगर यांत्रिक म्हणजेच फल्लटीवाले नौका आहेत . त्या नौकांपैकी काही नौका या जीवना बंदरावर उभ्या करून ठेवल्या जातात . पहाटेच्यावेळी जीवना बंदरावरून खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जात असतात . त्याच प्रमाणे मासेमारी करून आल्यावर पुन्हा जीवना बंदरावर येत असतात . मासे उतरविण्यासाठी त्याच प्रमाणे नौकेवर डिझेल , बर्फ , पाणी , इत्यादी जीवनाआवश्यकतेसाठी लागणाऱ्या वस्तुची नेआण करण्यासाठी जीवना बंदर जेटीचा वापर नौकामालक मच्छिमार करत असतात . या जेट्टीवरून दररोज हजारो नागरिक मोठ्या संख्यने ये - जा करत असतात . जीवना बंदर जेटीवर मोठ्या प्रमाणत शेवाळ वाढल्याने ये जा करणाऱ्या कित्येक मच्छिमांराचे पाय घसरून दुखापती झाल्या आहेत . आता तर जीवना बंदर जेटीवर मोठ्या प्रमाणात शेवाळाचे सामाज्या निर्माण झाले आहे . त्या ठिकाणी मालाची वाहतूक करत असताना आपला जीव मुठीत धरून ये जा करावी लागते . जीवना बंदर जेट्टीवर पर्यटक ताजी मासळीचा लिलाव पहाण्यासाठी येतात . त्याच प्रमाणे मुंबई , पुणे , नाशिक , गोवा , रत्नागिरी या व्यापारी वर्गसुध्दा जीवना बंदर मधील मासे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात . मात्र सध्या पर्यटकांना जीवना बंदर जेट्टीवर मनसोक्त आनंद घेता येत नाही . वाढत्या शेवाळामुळे जीवितहानी नाकारता येत नाही . तरी मुंबई मेरीटाईम बोर्ड मुंबई यांनी याकडे तातडीने लक्ष देवून कोणत्याही प्रकारची जीवितहाणी होणार नाही याची काळजी घ्यावी . यासाठी ठोस उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा