टीम म्हसळा लाईव्ह
ऋषीतुल्य जिवन, परिपक्व विचारसरणीचे, कौटुंबिक, सामाजिक पोक्तपणा, "जिवनतपस्वी" पांडुरंग गोविंद पयर यांचे वृद्धापकाळाने निधन..! ते अंदाजे ८५ वर्षाचे होते. सेंट मेरी सांताक्रूझ मुंबई येथून तत्कालीन मॅट्रिक झालेले खरसई मधील ते एकमेव होते. घरातूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाल्याने शिक्षणासह कुटुंब सांभाळून सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांनी भारतीय डाक विभागात शेवटपर्यंत निष्कलंक सेवा केली. ते प्रचंड धार्मिक वृत्तीचे व कला क्रीडेचे ज्ञाते होते. तसेच गोमतेला पूजनीय मानणारे त्यांच्या आजाराविषयी uउत्तम वैदकीय ज्ञान असल्याने त्यांच्या हातून उत्तम गोसेवा होत असे. त्यांच्या कार्यकाळात सातगाव आगरी समाज अध्यक्ष , अठरा गाव आगरी समाज, तसेच प्रथम खरसईगाव आगरी समाज अध्यक्ष यांसारख्या विविध पदांवर निश्स्पृहपणे कार्यरत होते. मनाने देवभोळे असल्याने त्यांनी आगरी, कोळी, मुस्लिम व बौद्ध यांच्यात समतोल राखून सामाजिक ऐक्य जपले. खरसई समाजाने त्यांच्यावर विद्यामंदिर उभारण्याची दिलेली जबाबदारी असो वा खरसईच्या विकासासाचा मुद्दा असो त्यात त्यांचे मोठे योगदान होते. आभ्यासू वृत्ती असल्याने तरुण वर्ग त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांच्याकडे आकर्षित होत असे. त्यांच्या उतार वयातही त्यांना गावाच्या विकासाबद्दल आत्मीयता होती. तरुण मुलांनी काहीतरी वेगळं करून नावलौकिक मिळवावा अशी त्यांची मनोमन इच्छा असायची. अश्या या व्यक्तिमत्वाच्या मागे त्यांच्या पत्नी पदीबाई नेहमीच खंबीरपणे उभ्या राहिल्या. अश्या या थोर व्यक्तिमत्वास पंचक्रोशीसह सारा समाज ज्ञान पंढरीच्या "पांडुरंगास" मुकला. त्याच्या पश्चात त्यांना दोन मुलं दोन मुली श्री अनंत पयर, श्री नारायण पयर, जना कांबळे, इंदिरा गाणेकर तसेच नातू विराज, चिंतामणी, प्रशांत , भास्कर, तृप्ती, रचना, गीतांजली, आणि हर्षदा असा परिवार आहे.
ठम मधली आळी मंडळासाठी पंचवीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी अध्यक्ष म्हूनण काम पाहिलं होत. तसेच सातगाव आगरी समाज अध्यक्ष आणि खरसई आगरी समाजाचे पहिले अध्यक्ष स्व पांडुरंग पयर यांच्या जाण्याने पंचाक्रोशीने उत्तम नेतृत हरवले आहे !
-श्री भालचंद्र म्हसकर, आगरी समाज कार्यकर्ते खरसई


Post a Comment