अलिबागच्या प्रणीत पाटीलाची नासाच्या मंगळ मोहीम संशोधनासाठी निवड


टीम म्हसळा लाईव्ह
नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहीमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी म्हणून प्रणीत पाटील अलिबागच्या थोर सुपुत्राची निवड झाली आहे. नासाच्या या मंगळ मोहिमेत आगरी समाजातील प्रणित पाटील याची निवड झाल्याने अलिबागचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. तर प्रणितमुळे आगरी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे, प्रणीतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पनवेलच्या मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कुलमध्ये झाले. २००९ मध्ये आयटी एमजीएम कॉलेज, कामोठे येथे पूर्ण केले आहे.


        अलिबाग तालुक्यातील मोठे शहापुर हे प्रणीतचे गाव. जन्म २७ जून १९८९ मध्ये आईच्या गावी अलिबाग तालुक्यातीलच मेढेखार या छोट्या गावात झाला. प्रणितचे वडील गजानन पाटील पोलीस खात्यात. वडिलांच्या बदलीमुळे सतत भटकंती. १९९१ मध्ये जुने पनवेलमध्ये आल्यावर प्रणीतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कुलमध्ये झाले. २००९ मध्ये आयटी एमजीएम कॉलेज, कामोठे येथे पूर्ण केले. सुरुवातीपासूनच अंतराळ व त्यासंबधातील त्याला आवड होती. मात्र आयटी शिकत असतांना इतर माहिती नव्हती. २०१० मध्ये घाटकोपर येथील अॅक्सेंचर कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सात ते नऊ महिने त्याने काम केले. त्यानंतर २०१०-११ अमेरिकन अलायन्झ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून रुजू झाला. ही कंपनी नासा एन्सापयर सिस्टिममध्ये सिलीका सप्लाय करते. ही कंपनी नासाची एक वेंडर होती. प्रणित त्याच्यासाठी प्रपोजल मॅनेजमेंट करु लागला.
        पनवेल येथील त्याच्या घरी निवृत्त पोलिस असलेले त्याचे वडील गजानन पाटील, आई शोभना पाटील, भाऊ प्रतिक पाटील (एलएलबी करतो) राहतात. त्याची पत्नी रसायन शास्त्रातून पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) आहे. आपली पत्नी अमृता व दोन वर्षाच्या श्रीणा या मुली सोबत अमेरिकेत राहतो. प्रणितचे आदर्श त्याचे वडिल आहेत. तर मेंटॉर डॉ. राजेंद्र पाटील हे आहेत.


        मराठी तरुणांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या तरुण सायंटिस्ट अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटीलचा अभूतपूर्व प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेले आहे. अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली जिद्द, खडतर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सध्या नासा या अंतरराष्ट्रिय अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तो चक्क अवकाशात जावून संशोधन करत आहे. आपले काम व यश फक्त स्वतः पुरते मर्यादीत न ठेवता समाजातील इतर युवकांना व विदयार्थ्यांना तो अंतराळ, रॉकेट व रोबोटिक्स सायन्स आदींचे मोफत मार्गदर्शन करुन त्यांना या क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्याच प्रशिक्षणाचा भाग म्हणून गोठण बिंदू खालील (-20) तापमानात 1/3 गुरुत्व बलावर मंगळसदृश्य सतत लाल वादळी वातावरणातील हे आव्हानात्मक प्रशिक्षण. फक्त पावडर खाऊन रहायचे व अंगाला जेली लावून अंग पुसायचे, जगाचा संपर्क बंद, मंगळाच्या वातावरणात स्वतःचा जीव जगवायचा व नवीन बीजारोपण करण्यासाठी तेथील संयुगे एकत्र करून प्रयोग करायचे. हे आव्हान यशस्वी पेलून हिंदुस्थानचा तिरंगा अभिमानाने नासात फडकवायचा मान प्रणित याला मिळाला आहे.


        अमेरिकन अलायन्स सोबत काम करत असतांना अंतराळाबद्दल असलेली आवड अधिक चांगल्या प्रकारे जोपासता आली. त्यांच्याकडून इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती मिळू लागली. नासा एडिअस जनरल रिडिंगची आवड, रिसर्च पेपर वाचन केले. नासाचे पॉवर पॉइंट अभ्यासले. मग अंतराळाबद्दल शास्त्रीय माहिती घेण्यासाठी ऑक्टोबर २०१४ मध्ये एज्युकेशन व्हिजा घेवून अमेरिकेतील अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या “एम्री रिडल एरोनॉटिकल” युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळविला. आपले काम सांभाळून शिक्षणही घेवू लागला. सन २०१६ सप्टेंबरमध्ये थ्री कन्टिन्युइंग एज्युकेशन युनिट (सीइयुस) इन सबऑर्बिटल मिशन सिम्युलेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण केली. यासाठी त्याला साडेपाच हजार अमेरिकन डॉलर म्हणजे खर्च आला. हा खर्च त्याने स्वतः केला. त्यानंतर नासाच्या ‘फ्लाइट अपॉर्च्युनिटीज (opportunities) प्रोग्रॅम’च्या प्रोजेक्ट पोसम (Possum) मध्ये त्याची थोडक्यात निवड हुकली. तिसऱ्यावेळी म्हणजे 2016 मध्ये 1602 बॅच मध्ये सायंटिस्ट अस्ट्रेनॉट कँडिडेट या पदासाठी त्याची निवड झाली. त्याने जगविख्यात पायलट पॅटी वागस्टाफ यांच्या कडून एरोबॅटिक्स प्रशिक्षण घेतले आहे. तसेच ‘साऊदर्न ऐरोमेडीकल (Southern AeroMedical) इन्स्टिट्यूट’मधून डॉ. पॉल बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अॅडव्हान्स चेंबर प्रोग्राम’ देखिल पुर्ण केला आहे. तसेच ‘स्विस स्पेस सेंटर’ आणि ‘ईपीएफएल’ (EPFL ) मधून स्पेस मिशन डिजाईन आणि ऑपरेशन कोर्स (operation course) पूर्ण केला आहे. सोबतच तो नासा स्पेस सेंटरचे ‘फिझिकल सायन्स इन्फॉरमॅटिक सिस्टिम’मध्ये (physical science informatics) ‘अॅनालिटिकल युजर’ (analytical user ) म्हणूनही कार्यरत आहे.
  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा