गणेश नगर येथे माघी गणेश जयंती उस्तव सोहळा उत्साहात संपन्न. .




प्रतिनिधी गणेश नगर
सुख समृद्धीचा वर्षाव करत, ढोल ताशाचा नाद घुमवत ..
नवचैतन्याचा गुलाल उधळत मु. गणेश नगर, ता. म्हसळा. जि. रायगड. यथे माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. पहाटे 4.30 पासुन श्री गणेश अभिषेक, सत्यनारायण महा पूजा, श्री गणेश भंडारा, श्री गणेश पालखी मिरवणूक, ज्येष्ठ नागरिक सत्कार, मनोरंजन साठी हिंदी मराठी गाण्यांचा रंग बहर  सांस्कृतिक कार्यक्रम व एकांकिका नाटक तात्यांचं  वस्त्रहरण हे नाटक गावातीलच कलाकार किरण कांबळे यांनी दिग्दर्शक केलं. तरी या सोहळ्या साठी म्हसळा तालुक्यातील म्हसळा तालुका पोलिस निरीक्षक श्री कोले साहेब, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री समीर बनकर साहेब, से का प चिटणीस श्री संतोष पाटील साहेब, से का प युवा अध्यक्ष श्री निलेश मंदाडकर, उप सभापती श्री चाचले साहेब, भा.ज. पा. जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा कोबनाक साहेब, इत्यादी नी श्री गणेशाचं दर्शन व मंडळास भेट दिली, हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री ग्रामस्थ मंडळ गणेश नगर व सावित्री महिला मंडळांनी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा